शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस येथील शालेय विद्यार्थी ‘माती’च्या आहारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 11:53 IST

यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस शहरातील शालेय विद्यार्थ्यांना माती विकत घेऊन खाण्याच्या व्यसनाने पछाडले आहे. शाळेसमोर दोन-तीन रुपयात मिळणारे मातीचे पाकीट विकत घेऊन विद्यार्थी चवीने ही माती खाताना दिसून येतात.

ठळक मुद्देशाळांसमोर खुलेआम विक्री विषाचा अंश असण्याची शक्यता

प्रकाश सातघरे ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस शहरातील शालेय विद्यार्थ्यांना माती विकत घेऊन खाण्याच्या व्यसनाने पछाडले आहे. शाळेसमोर दोन-तीन रुपयात मिळणारे मातीचे पाकीट विकत घेऊन विद्यार्थी चवीने ही माती खाताना दिसून येतात. या मातीमध्ये विषारी अंश असल्याचे सांगितले जात असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.शहरातील शाळा व महाविद्यालयासमोर अनेक दुकानामध्ये माती खुलेआम विकली जात आहे. मातीचे पाकीट दोन-तीन रुपयाला मिळते. पांढऱ्या रंगाचे खडे असलेली ही माती विद्यार्थी विकत घेवून खातात. ही माती खालल्यानंतर दिवसभर भूक लागत नाही आणि थोडी गुंगी येत असल्याचे सांगितले जाते. हा प्रकार गेल्या कित्येक दिवसापासून खुलेआम सुरू आहे. परंतु यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. विशेष म्हणजे ही माती पोटात गेल्यानंतर त्याचे गोळे बनतात. काही दिवसातच त्याचा परिणाम रक्तवाहिन्यांवर होवून किडणीचे आजारही उद्भवू शकतात. ही माती नेमकी काय आहे याचा तपास होणे गरजेचे असल्याचे पालकांचे मत आहे.अनेक विद्यार्थ्यांना या मातीचा त्रास झाल्याचे सांगितले जाते. काही पालकांनी मुख्याध्यापकांना माहिती दिली. वर्गशिक्षकांनी माती खाण्यास मनाई केली. बॅगची तपासणी करण्यात आली. हा प्रकार उजेडात आल्याने अनेक पालकांनी मुलांना याबाबत सूचना दिली. यावर वेळीच अटकाव आणला नाही तर विद्यार्थी नशेच्या आहारी जाण्याची भीती आहे.विद्यार्थी नशेच्या आहारीदिग्रस शहरातील १५ ते १७ वयोगटातील अनेक मुले खर्रा, तंबाखू, सिगारेट एवढेच नव्हेतर दारू आणि गांजाच्या आहारी गेले आहे. अनेक मुले दिवसभर या नशेच्या अंमलात असतात. नशेतून सुसाट वेगाने दुचाकी चालविणे असे प्रकार घडतात. पोलिसांनी यावर लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Healthआरोग्य