शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

विद्यार्थ्यांनी वसतिगृहात गृहपालास कोंडले

By admin | Updated: December 13, 2014 02:28 IST

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार देण्यात आलेल्या भोजन कंत्राटदारास हटविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी चक्क गृहपालास कोंडल्याची घटना ...

पुसद : विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार देण्यात आलेल्या भोजन कंत्राटदारास हटविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी चक्क गृहपालास कोंडल्याची घटना शुक्रवारी येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात घडली.या वसतिगृहात अनधिकृत भोजन करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून विद्यार्थी मनमानी करीत यंत्रणेला वेठीस धरीत असल्याचा आरोप आदिवासी विकास कार्यालयाकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे येथील कर्मचारीवर्गात तीव्र असंतोष धुमसत आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येथील शनि मंदिराजवळ शासकीय आदिवासी वसतिगृह चालविण्यात येते. या वसतिगृहात ७५ विद्यार्थ्यांची क्षमता असून सध्या येथे १०१ विद्यार्थी प्रवेशित आहे. तसेच येथे दररोज ४० ते ५० विद्यार्थी अनधिकृत भोजन घेत असल्याची धक्कादायक माहिती आहे. या बाहेरच्या विद्यार्थ्यांना भोजन देण्यास नकार दिल्यावर येथील विद्यार्थी भोजन ठेकेदारास वेठीस धरतात. यातून गृहपालास कोंडून ठेवणे, स्वयंपाकगृहाला कुलूप ठोकणे, खोट्या तक्रारी करणे आदी प्रकार नित्याचेच झाल्याचे सांगण्यात आले. यातूनच गृहपाल शेख मोहमद यांना दुपारी कोंडण्यात आले.वरिष्ठांनी सदर घटनेला गांभीर्याने घेवून पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे. या बाबत प्रकल्प अधिकारी उल्हास सकवान यांच्याशी संपर्क साधला असता विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामागे वेगळा चेहरा असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी प्रत्येक महिन्याला भोजन ठेकेदार बदलण्याची मागणी करीत असून ठेकेदाराची नियुक्ती ई-निविदेद्वारे आयुक्त अमरावती यांच्यामार्फत होते. विद्यार्थ्यांनी या पूर्वीही खोडके नामक गृहपालास विनाकारण कोंडले होते. हे प्रकार थांबविण्यासाठी वसतिगृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे सकवान म्हणाले. (प्रतिनिधी)