शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

इसापूरच्या विद्यार्थ्यांची पोलिसात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 12:10 AM

तालुक्यातील इसापूर येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात गैरसोय होत असल्याने विद्यार्थ्यांनी सोमवारी थेट दिग्रस पोलीस ठाण्यात धाव घेतली.

ठळक मुद्देवसतिगृहातील गैरसोय : अशुद्ध पाणी, पंखे नादुरुस्त, पुस्तकांचा अभाव

आॅनलाईन लोकमतदिग्रस : तालुक्यातील इसापूर येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात गैरसोय होत असल्याने विद्यार्थ्यांनी सोमवारी थेट दिग्रस पोलीस ठाण्यात धाव घेतली. वसतिगृहातील समस्या पोलिसांना सांगून या समस्या सोडविण्यासाठी विनंती केली.दिग्रस तालुक्यातील इसापूर येथे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहात विद्यार्थ्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाही. आंघोळ, पिण्यासह वापरण्यासाठी एकाच पाण्याच्या टाकीचा वापर करावा लागतो. परिणामी विद्यार्थ्यांना अशुद्ध पाणी प्यावे लागते. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वृत्तपत्रे आणि मासिक मिळत नाही. भोजनात अस्वच्छता असते. दुधातही भेसळ आढळून येते. १२ वीचे सत्र संपत आले तरी पुस्तके उपलब्ध झाली नाही. मासिक निर्वाह भत्ता वेळेवर मिळत नाही. चालू शैक्षणिक सत्रातील तसेच मागील वर्षातील क्रीडा साहित्य अद्यापही उपलब्ध झाले नाही. कोणत्याही विद्यार्थ्याचा विमा काढण्यात आला नाही. तसेच संगणकही हाताळायला मिळत नाही. वसतिगृहातील पंखेही नादुरुस्त आहे. याबाबी वारंवार सांगूनही कुणी लक्ष देत नसल्याने या विद्यार्थ्यांनी दिग्रस ठाण्यात धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक रणजित सिरसाट, वनदेव कापडे, गणेश मोरे यांना ही माहिती दिली. त्यांनी तत्काळ गृहपाल सुजित वाठोरे यांच्याशी संपर्क साधून समस्या दूर करण्यासाठी ठाण्यात बोलाविले.