शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी साकारली बँक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 22:10 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत गरिबीतून उच्च शिक्षण घेतले. आजही खेड्यापाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना पैशाविना शिकता येत नाही.

ठळक मुद्देबाबासाहेबांचा आदर्श : पहिल्याच दिवशी ५० खातेधारक, दीडशेचे टार्गेट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत गरिबीतून उच्च शिक्षण घेतले. आजही खेड्यापाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना पैशाविना शिकता येत नाही. त्यामुळेच बाबासाहेबांचीच प्रेरणा घेत गणेरीच्या विद्यार्थ्यांनी चक्क बँकच सुरू केली आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनी बँक’ सुरू करणाºया चिमुकल्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.विद्यार्थी दिवसाचे औचित्य साधून बाभूळगाव तालुक्यातील गणोरी या गावातील मुलांनी बँक सुरू केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी शाळेत प्रवेश घेतला होता. हा दिवस सर्व शाळांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. केवळ भाषण, स्पर्धा असे उपक्रम राबविण्यापेक्षा गणोरीच्या जिल्हा परिषद शाळेने कृती केली. कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणासाठी पैशाची अडचण भासू नये, यासाठी विद्यार्थ्यांची बँक सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी शाळेतील ५० विद्यार्थी या बँकेचे खातेदार झाले आहेत. शाळेची पटसंख्या दीडशे असून सर्व विद्यार्थी खातेदार व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. शालेय उपक्रम, खरेदी अशा गोष्टींसाठी या बँकेतून विद्यार्थ्यांना मदत मिळेल.चौथीची विद्यार्थिनी श्रावणी भितकर हिच्या हस्ते ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनी बँके’चे रितसर उद्घाटन करण्यात आले. ही बँक स्थापन करण्यासाठी मुख्याध्यापक अनिल नाईक, कल्पना डवले, सीमा मंगाम, प्रमोद गजभिये, वंदना राठोड, चंद्रबोधी घायवटे आदींनी पाठिंबा दिला.बँकेचे काम दोन दिवसगणोरीच्या शाळेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनी बँकेचे कामकाज आठवड्यातून दोन दिवस चालणार आहे. शुक्रवार हा बँकेत रक्कम डिपॉझिट करण्याचा दिवस असेल. तर सोमवार हा दिवस विड्रॉलसाठी ठेवण्यात आला आहे. गुरुवारी बाभूळगावचा बाजार असल्याने मजुरांना मजुरीचे पैसे मिळतात. त्यातील काही रक्कम मुले आपल्या बँकेत शुक्रवारी जमा करणार आहेत. अमन इंगोले, अन्वेश गोटे, मयूर मोकाशे हे विद्यार्थी बँकेचे कामकाज सांभाळणार आहे. या बँकेत केवळ दहाच्या पटीतील रकमा स्वीकारल्या जाणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.