शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 23:42 IST

संतोष शंकर डांगे (१४) रा. लासीना ता. जि. हिंगोली असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे तो शाळेत गेला होता. मात्र सायंकाळी घरी परतला नाही. त्याचे वडील व नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र संतोष कुठेही आढळला नाही. त्यामुळे त्यांनी रात्री मराठवाड्यातील कळमनुरी पोलीस ठाण्यात संतोषचे अपहरण झाल्याची तक्रार दिली.

ठळक मुद्देउमरखेड तालुक्यातील घटना : मृत हिंगोली जिल्ह्यातील

लोकमत न्यूज नेटवर्कमुळावा : उमरखेड तालुक्यातील झाडगाव शिवारात एका विद्यार्थ्याचा खून करून त्याचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.संतोष शंकर डांगे (१४) रा. लासीना ता. जि. हिंगोली असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे तो शाळेत गेला होता. मात्र सायंकाळी घरी परतला नाही. त्याचे वडील व नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र संतोष कुठेही आढळला नाही. त्यामुळे त्यांनी रात्री मराठवाड्यातील कळमनुरी पोलीस ठाण्यात संतोषचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. दरम्यान रात्रभर त्याचा शोध घेण्यात आला. मात्र मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मुळावा लगतच्या झाडगाव-भांबरखेडा शिवारात त्याचा पुरलेल्या अवस्थेतील मृतदेहच आढळून आला. मुळावा ते हिंगोली हे अंतर केवळ ५० किलोमीटर आहे.मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास झाडगाव ग्रामस्थांना गावालगत अर्धवट स्थितीत पुरलेला मृतदेह आढळला. तेथील पोलीस पाटील वसंतराव देशमुख यांनी लगेच पोफाळी पोलिसांना माहिती दिली. पोफाळीचे ठाणेदार कैलास भगत यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांनी अर्धवट स्थितीत पुरलेला संतोषचा मृतदेह बाहेर काढला. काही अंतरावर एक स्कूल बॅग आढळली. त्यामधील ओळखपत्रावरून मृताची ओळख पटली. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार, एलसीबी प्रमुख प्रदीप शिरस्कार यांनी भेट दिली.यवतमाळ येथील श्वान पथक पाचारण करण्यात आले. मात्र या पथकाला आरोपीचा माग काढण्यात यश आले नाही. या प्रकरणी पोफाळी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खून आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला.सुपारी घेऊन खून केल्याचा संशयया खून प्रकरणातील आरोपी गुन्हेगार असून संख्येने ते तीन ते चार असावे, असा संशय पोफाळी पोलिसांनी व्यक्त केला. आरोपींनी खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यामुळे हा संशय बळावला आहे. ठाणेदार कैलास भगत यांच्यासह संतोष हराळ, नाना म्हस्के, विजय जाधव, देविदास लांडगे, अमोल कानेकर, राहुल मडावी यांनी हा गुन्हा उघडकीस आणला. पुढील तपासाकरिता हे प्रकरण कळमनुरी पोलिसांना हस्तांतरित केले जाणार असल्याची माहिती ठाणेदार भगत यांनी दिली. संतोषच्या खुनाचे रहस्य मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीMurderखून