शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

पिस्तुलासह कुख्यात देवाला अटक

By admin | Updated: January 30, 2016 02:40 IST

शहराच्या गुन्हेगारी विश्वातील कुख्यात देवा पवार याला वडगाव रोड पोलिसांनी देशी बनावटीच्या पिस्तुलासह गुरूवारी रात्री ९.४५ वाजता अटक केली.

खुनातील आरोपी : आठवडी बाजार परिसरात अटकयवतमाळ : शहराच्या गुन्हेगारी विश्वातील कुख्यात देवा पवार याला वडगाव रोड पोलिसांनी देशी बनावटीच्या पिस्तुलासह गुरूवारी रात्री ९.४५ वाजता अटक केली. आठवडी बाजार परिसरात केलेल्या या कारवाईत एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.लोहारा येथील बहुचर्चित आरती इंगोले खुनप्रकरणातील मुख्य आरोपी देविदास उर्फ देवा अमरसिंग पवार (४०) रा. महात्मा फुले सोसायटी, वाघापूर, हा काही दिवसापूर्वी जामीनावर बाहेर आला आहे. त्याच्या हालचालीवर पोलिसांचे बारीक लक्ष होते. गुरूवारी रात्री देवा हा पिस्तुल घेऊन आठवडी बाजार परिसरात फिरत असल्याची माहिती वडगाव रोड ठाण्यातील जमादार विकास खडसे यांना मिळाली. त्यांनी याची सूचना सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गिते यांना दिली. तातडीने त्यांनी आठवडी बाजार परिसर गाठून देवाला अटक केली. ही कारवाई बबलु चव्हाण, बंडू मेश्राम यांनी केली. देवा जवळचे पिस्तुल पश्चिम बंगाल बनावटीचे असून त्याचा बोअर ५.६ एमएम आहे. यापूर्वीसुध्दा या कर्मचाऱ्यांनी अ‍ॅन्टी गँगसेलमध्ये असताना बंगाली बनावटीचे तीन पिस्तुल पकडले होते. या कारवाईची माहिती मिळातच पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी वडगाव रोड ठाण्याला भेट देऊन कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. आरोपी देवाने हे पिस्तुल कोठून खरेदी केले, याचे राऊंड आहेत काय, याचा तपास सुरू आहे. आरोपीचा न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द करावा, असा अर्जही पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती आहे. (कार्यालय प्रतिनिधी)