शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक सुरू होताच एसटीचे उत्पन्न ३७ लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 05:00 IST

दिवाळीनंतर लांब पल्ल्यांच्या गाड्यांना पहिली पसंती मिळाली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील बसफेऱ्या सर्वाधिक उत्पन्न मिळवून देत आहे. लांब पल्ल्यांच्या बसमध्ये अकोला, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, सांगली, नांदेड या गाड्यांमध्ये सर्वाधिक प्रवासी मिळाले आहे.  दरवर्षी पुण्यावरून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे सर्व प्रवासी दिवाळीपूर्वीच गावी आल्याने एसटीला या उत्पन्नास मुकावे लागले. पुढील काळात एसटी पूर्वप्रमाणेच उत्पन्न वाढेल.

ठळक मुद्देदररोज ४२ हजार प्रवाशांची वर्दळ

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :   कोरोनामुळे एसटीचा प्रवास बंद झाला होता. राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू केल्यानंतरही प्रवासी बसमध्ये जाण्यासाठी तयार नव्हते. दिवाळीपूर्वी फार कमी गर्दी बसमध्ये होती. मात्र दिवाळी संपताच हे चित्र बदलले आहे. दर दिवसाला ४२ हजार प्रवासी प्रवास करीत आहे. यातून राज्य परिवहन महामंडळाचे उत्पन्न ३७ लाखांवर पोहोचले आहे. दिवाळीनंतर लांब पल्ल्यांच्या गाड्यांना पहिली पसंती मिळाली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील बसफेऱ्या सर्वाधिक उत्पन्न मिळवून देत आहे. लांब पल्ल्यांच्या बसमध्ये अकोला, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, सांगली, नांदेड या गाड्यांमध्ये सर्वाधिक प्रवासी मिळाले आहे. दरवर्षी पुण्यावरून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे सर्व प्रवासी दिवाळीपूर्वीच गावी आल्याने एसटीला या उत्पन्नास मुकावे लागले. पुढील काळात एसटी पूर्वप्रमाणेच उत्पन्न वाढेल. हे उत्पन्न ७० लाखापर्यंत जाईल, अशी आशा आहे. कोरोना आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी सॅनिटायझरचा स्प्रे बंधनकारक करण्यात आला आहे. 

दररोज सॅनिटायझर वाढविण्याची गरजप्रत्येक आगाराने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर फवारणी बंधनकारक आहे. मात्र वाढलेली गर्दी पाहता या नियमाचे पालन होत नाही. बसमध्ये प्रवासी खचाखच भरलेले असतात. अशा परिस्थितीत सॅनिटायझरचा फवारा करताच येत नाही. हा फवारा झाल्यास प्रवसी अधिक सुरक्षित होतील.  

फिजिकल डिस्टन्सचा उडतोय बोजवाराबसफेऱ्या कमी आणि प्रवासी जास्त अशा परिस्थितीत बसमध्ये जागा नसल्यामुळे अनेकांना उभे राहात प्रवास करावा लागतो. या परिस्थितीत दोन जागेच्या सीटवर तीन जण बसलेले असतात. कंडक्टरलाही तिकीट काढण्यासाठी दाटीहून पुढे मार्ग काढावा लागतो. 

एसटीचा प्रवास सर्वाधिक सुरक्षितराज्य परिवहन महामंडळाने एसटी बस सुरू करताच खासगी वाहनांकडे प्रवास भाडे कमी झाले आहे. सर्वाधिक सुरक्षित सेवा म्हणून प्रवासी एसटीकडे वळले आहे. ग्रामीण भागातून सर्वाधिक प्रवासीदिवाळीनंतर माहेरी जाण्यासाठी गृहिणी मोठ्या प्रमाणात प्रवासाला निघाल्या आहे. गावखेड्यातून प्रवासी मोठ्या प्रमाणात शहराकडे आणि जिल्ह्यातील इतर गावांकडे वळले. 

टॅग्स :state transportएसटी