शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

एसटीची प्रवासी मर्यादा ‘अनलॉक’; पूर्ण क्षमतेने वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 19:07 IST

कर्नाटक व गुजरात राज्यात यापूर्वीच पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रात परवानगदी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देपाच हजार बसेसचा प्रवास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या भीतीने लोकवाहिनीतून ५० टक्केच प्रवासी वाहतूक सुरू होती. आता धोका संपला नसली तरी, नाईलाजाने का होईना शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने प्रवासी घेऊन एसटी बसेस मार्गावर धावत आहे. राज्यातील विविध मार्गावर पाच हजारावर बसेस प्रवाशांना सेवा देत आहे.

एसटीने प्रवासी वाहतुकीला शासनाने २० ऑगस्टपासून परवानगी दिली. ५० टक्के प्रवासी घेऊन, सोशल डिस्टन्सिंग पाळून, बसेस सॅनिटायझर करून प्रवासी वाहतुकीला मुभा देण्यात आली होती. ५० टक्के प्रवासी घेऊन होणारी वाहतूक आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने महामंडळाने पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीची मुभा मिळावी, अशी मागणी शासनाकडे केली. याला होकार देण्यात आला आहे. कर्नाटक व गुजरात राज्यात यापूर्वीच पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रात परवानगदी देण्यात आली आहे.

बसेसचे निर्जंतुकीकरण, प्रत्येक प्रवाशाने तोंडला मास्क बांधणे आवश्यक अशा अटींवर ही परवानगी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत दिवसभरात राज्यभरातील विविध मार्गावर पाच हजार बसेस धावत आहेत. या माध्यमातून पाच ते लाख लोकांची वाहतूक होत आहे. महामंडळाकडे १८ हजार बसेस आहेत. प्रवासी संख्या वाढल्यानंतर या सर्व बसेस मार्गावर धावताना दिसणार आहे.

५० टक्के प्रवासी क्षमतेने होणाऱ्या वाहतुकीमुळे महामंडळाला आर्थिक फटका बसत होता. पहिली बस ५० टक्के प्रवाशांना घेऊन प्रवासाला निघाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या प्रवाशांकरिता दुसरी बस सोडावी लागत होती. यामध्ये प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागण्यासोबतच एसटीचा खर्चही वाढत होता. आंतरजिल्हा वाहतूक आणि ई-पासचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली आहे.पगार केव्हा देता, कर्मचाऱ्यांचा प्रश्नजुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचा पगार झाला नाही. घर चालवायचे कसे, हा एसटी कर्मचाºयांचा प्रश्न आहे. महामंडळाने आर्थिक मदतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. प्रत्येक प्रगारासाठी शासनापुढे हात पसरवावे लागत आहे. शासनाच्या आदेशानेच ५० टक्के वाहतूक सुरू करण्यात आली होती. यात एसटीचे नुकसान झाले. म्हणून शासनाने भरपाई द्यावी, अशी कर्मचाºयांची मागणी आहे. दरम्यान, कोरोना संपेपर्यंत शासनाने महामंडळाला दरमहा ४०० कोटींची आर्थिक मदत करावी, असे निवेदन एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, अध्यक्ष संदीप शिंदे यांनी शासनाला दिले आहे.

टॅग्स :state transportएसटी