शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

तिवरंग येथे पाण्यासाठी दोन गटांत मारहाण

By admin | Updated: April 10, 2016 02:44 IST

उमरखेड तालुक्याच्या तिवरंग येथे नवीन गावठाणावर पिण्याचे पाणी भरण्यावरून दोन गटांत हाणामारी झाली.

महिलेसह तिघे जखमी : नांदेडला हलविले, १५ जणांविरुद्ध गुन्हा मुळावा : उमरखेड तालुक्याच्या तिवरंग येथे नवीन गावठाणावर पिण्याचे पाणी भरण्यावरून दोन गटांत हाणामारी झाली. यात महिलेसह तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ नांदेडला हलविण्यात आले. मारोती मोतीराम जमदाडे, पंचफुला मारोती जमदाडे, विलास मारोती जमदाडे अशी जखमींची नावे आहे. या प्रकरणी पोफाळी पोलीस ठाण्यात जीवन गोधाजी गायकवाडसह १५ जणांविरुद्ध भादंवि १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिवरंग नवीन गावठाण येथे यावर्षी १२ लाख रुपये खर्च करून नळयोजना कार्यान्वित करण्यात आली. परंतु विहिरीला दोन महिन्यांपासून पाणी नाही, म्हणून ग्रामपंचायतीने झाडगाव ता.उमरखेड येथील रुस्तम शिंदे यांच्या शेतातील बोअरवेल अधिग्रहीत केली. या ठिकाणावरून स्प्रिंकलरचे पाईप टाकून पाणी घेण्यात येत होते. शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास विनोद शामराव गायकवाड पाणी भरण्यासाठी आला असता विलास जगदाडे याचा त्यांच्याशी वाद झाला. हा वाद वाढत गेल्याने दोन गट समोरासमोर आले. त्यातून त्यांच्यात हाणामारी झाली. यात महिलेसह तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेडला उपचार सुरू आहे. पोफाळीचे ठाणेदार सरदारसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनात जमादार रमेश इंगोले, शिपाई संजय चव्हाण तपास करीत आहे. मारहाणीच्या या घटनेमुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहे. (वार्ताहर)