शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाहीनबागच्या धर्तीवर यवतमाळात बेमुदत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

येथील छोटी गुजरी परिसरातील जुनी अंजुमन शाळा या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. १ फेब्रुवारीपासून हे आंदोलन बेमुदत काळासाठी सुरू करण्यात येत आहे. यात दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत महिला धरणे देणार आहेत. यादरम्यान महिलांना आमंत्रित करून विविध प्रकारचे उपक्रमही राबविले जाणार आहे. त्याअंतर्गत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध कलाकृती सादर केल्या जाणार आहे.

ठळक मुद्देआजपासून आंदोलन : शाहीनबाग आंदोलन कमिटीला विविध संघटनांचा पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सध्या देशभरात रणकंदन माजले आहे. दिल्लीत शाहीनबाग आंदोलन सुरू आहे. त्याच धर्तीवर यवतमाळातही बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती यवतमाळ शाहीनबाग आंदोलन कमिटीच्या वतीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.येथील छोटी गुजरी परिसरातील जुनी अंजुमन शाळा या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. १ फेब्रुवारीपासून हे आंदोलन बेमुदत काळासाठी सुरू करण्यात येत आहे. यात दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत महिला धरणे देणार आहेत. यादरम्यान महिलांना आमंत्रित करून विविध प्रकारचे उपक्रमही राबविले जाणार आहे. त्याअंतर्गत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध कलाकृती सादर केल्या जाणार आहे. शिवाय सीएए, एनआरसी, एनपीआर आदींबाबत माहिती दिली जाणार आहे. दिल्ली येथील शाहीनबागच्या महिलांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने आंदोलनाला सुरूवात केली आहे. त्याला पाठिंबा देत देशभरात जिल्हा आणि तालुका पातळीवर जवळपास २०० ठिकाणी आंदोलन सुरू झाले आहे.यवतमाळ येथेही महिला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणार आहे. सीएए कायदा रद्द व्हावा, एनआरसी, एनपीआर थांबवावे, जेएमयू, एएमयू, जेएनयू येथील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी व्हावी, देशात निर्माण झालेली अराजकता केंद्र सरकारने लवकरात लवकर नियंत्रणात आणावी, नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात मुस्लीम, अनुसूचित जाती, जमातीच्या व इतर धर्मीय महिलांचादेखील सहभाग राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.शांततापूर्ण मार्गानेच आंदोलन करावेदरम्यान, दोन दिवसांपूर्वी यवतमाळात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. या आंदोलनावेळी शहरात आंदोलक आणि काही व्यापारी यांच्यात वाद झाला. आंदोलनात अशी घटना घडू नये, आम्ही अशा घटनांचा निषेध करतो. कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण मार्गानेच आंदोलन केले पाहिजे. पण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची पोलिसांचीही जबाबदारी होती, असे मत पत्रकार परिषदेत जमाते इस्लामी हिंदचे अध्यक्ष जियाउद्दीन यांनी व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला जियाउद्दीन यांच्यासह मुफ्ती एजाज, अ‍ॅड. नासिर खिलजी, मौलवी शारीक मुजाहिदी, जमा खाँ, स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशनच्या सायमा रहमान आदी उपस्थित होते.

टॅग्स :Strikeसंप