शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दूध, तेलाची ‘ताकद’ वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:16 IST

मानवी शरीराला अत्यावश्यक असलेले व्हिटॅमिन्स अन्नद्रव्यांमधून पुरेशा मात्रेत मिळत नाही. परिणामी याची डिफीसेन्सी (कमतरता) आढळून येते. ही उणीव भरुन काढण्यासाठी दैनंदिन सेवनातील दूध व खाद्य तेलाला आणखी पौष्टिक केले जाणार आहे.

ठळक मुद्देडिफीसेन्सी दूर करण्यासाठी व्हिटॅमिन्स । अन्नद्रव्यात जीवनसत्त्वाच्या पूर्ततेचा प्रशासनाचा प्रयत्न

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मानवी शरीराला अत्यावश्यक असलेले व्हिटॅमिन्स अन्नद्रव्यांमधून पुरेशा मात्रेत मिळत नाही. परिणामी याची डिफीसेन्सी (कमतरता) आढळून येते. ही उणीव भरुन काढण्यासाठी दैनंदिन सेवनातील दूध व खाद्य तेलाला आणखी पौष्टिक केले जाणार आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने पुढाकार घेतला आहे. उत्पादकांना अमरावती येथे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.व्हिटॅमिन्सच्या (जीवनसत्व) कमतरतेमुळे अनेक आजार जडतात. प्रामुख्याने व्हिटॅमिन्स ए, डी व ई याची कमतरता खाद्य अन्नांमध्ये दिसत आहे. नैसर्गिक प्रक्रियेद्वारे व्हिटॅमिन्स शरीराला खाद्यान्नातून मिळणे आवश्यक आहे. हे व्हिटॅमिन्स नसल्याने गंभीर स्वरूपाचे आजार जडतात. मानवाच्या इंद्रियावर याचा गंभीर स्वरूपाचा परिणाम होतो. डब्ल्यूएचओकडून याबाबत मोठे अभियानही राबविले जाते. दैनंदिन सेवनात येत असलेल्या दुधातून किंवा खाद्य तेलातून असे व्हिटॅमिन्स देता येईल का याचा शोध अन्न व औषध प्रशासन विभागाने घेतला. त्यासाठी दूध व तेल उत्पादकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. अमरावती येथे या संदर्भात कार्यशाळा झाली. विविध संस्थांनी व तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख दूध उत्पादक, शासनाच्या या आव्हानाला प्रतिसाद देत फोर्टीफाईड दूध तयार करण्यासाठी पुढे आले आहे. यामध्ये वात्सल्य, रानडे, अमृतधारा, नमस्कार, हिंदूजा महिला को.आॅप. सोसायटी यांनी सहभाग घेतला. या प्रमाणेच तेल उत्पादकांमध्ये नेर, बोरीअरब, पुसद, वणी, दिग्रस येथील फर्मचा समावेश आहे.फोर्टीफाईड दूध व तेलसूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून व्हिटॅमिन्स ए, डी व ई ओळखले जाते. याची कमतरता दूर करण्यासाठी अतिरिक्त मात्रेत ते दूध व खाद्य तेलात शास्त्रशुद्ध पद्धतीने मिसळण्यात येते. अशा तेल व दुधाला शास्त्रीय भाषेत फोर्टीफाईड दूध, तेल म्हणून संबोधले जाते. याचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे.व्हिटॅमिन्सची कमतरता औषधातून भरुन काढण्याऐवजी फोर्टीफाईड दूध व तेलाचा पर्याय चांगला आहे. दैनंदिन सेवनातून शरीराची जीवनसत्त्वाची गरज भागविता येणार आहे. यासाठी उत्पादकांना सक्ती नाही, त्यानंतरही सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला.- गोपाल माुहरेअन्न निरीक्षक, यवतमाळ

टॅग्स :milkदूध