शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

खाकीवर्दीची ताकद उमरखेडमध्ये एकवटली

By admin | Updated: October 13, 2016 00:38 IST

गणेशोत्सवातील गालबोट लागल्याच्या घटनेचा अनुभव पाठीशी असल्याने दुर्गोत्सवात जिल्हा पोलीस प्रशासनाने प्रचंड खबरदारी घेतली आहे.

दुर्गा विसर्जन : एसपी, अ‍ॅडिशनलचा मुक्काम, होम साहेबांसह सर्वच तैनात, तगडा बंदोबस्तयवतमाळ : गणेशोत्सवातील गालबोट लागल्याच्या घटनेचा अनुभव पाठीशी असल्याने दुर्गोत्सवात जिल्हा पोलीस प्रशासनाने प्रचंड खबरदारी घेतली आहे. पोलीस दलाची प्रमुख शक्ती उमरखेडमध्ये एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले. उमरखेड येथे दुर्गा विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. शहरात प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह मंगळवारपासून उमरखेडमध्ये तळ ठोकून आहे. दसऱ्याचा सणही त्यांनी उमरखेडातच साजरा केला. त्यांच्या दिमतीला अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, गृह पोलीस उपअधीक्षक तामगाडगे यांच्या नेतृत्वातील फौज तैनात आहे. जिल्हा पोलीस दलाने संपूर्ण लक्षच उमरखेडवर केंद्रित केले. गणेशोत्सवाची पुनरावृत्ती दुर्गोत्सवात होवू नये, या दृष्टीने संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यामध्ये अन्य संवेदनशील ठिकाणांची जबाबदारी ठाणेदार व तेथील एसडीपीओंकडेच सोपविण्यात आली आहे.राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर पोलीस महासंचालक यादव यांना स्वत: स्थितीचा आढावा घेण्यासाठी दुर्गोत्सवापूर्वी उमरखेडला यावे लागले. यावरून उमरखेडच्या घटनेची तीव्रता महासंचालक कार्यालयापर्यंत धडकल्याचे स्पष्ट होते. म्हणूनच दुर्गा विसर्जनाच्यावेळी बंदोबस्तात कोणतीही कमी राहणार नाही, याची खबरदारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली. (जिल्हा प्रतिनिधी)महासंचालकांची व्यूहरचना उमरखेडमुळे फेलराज्यात सर्वत्र गणेशोत्सव शांततेत पार पडला असताना केवळ उमरखेडमुळे या उत्सवाला गालबोट लागले. यंदा कोणत्याही गालबोटाशिवाय गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याची पोलीस महासंचालक सतीश माथूर यांची व्यूहरचना उमरखेडच्या घटनेमुळे फेल ठरली.