शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

रस्त्यावरचे ‘सपनो के सौदागर’ संकटात

By admin | Updated: September 19, 2015 02:21 IST

हजारो तरुण नोकरीचे स्वप्न पाहतात. साऱ्यांचेच पूर्ण होतात, असे नाही. पण सचोटीच्या लढवैय्यांना यश मिळतेही.

नोकरीचे अर्ज विक्रेते : आॅनलाईन प्रक्रियेमुळे ओसरली गर्दीअविनाश साबापुरे यवतमाळ हजारो तरुण नोकरीचे स्वप्न पाहतात. साऱ्यांचेच पूर्ण होतात, असे नाही. पण सचोटीच्या लढवैय्यांना यश मिळतेही. बेरोजगारांच्या उरातील या स्वप्नांवरच काही जणांनी स्वत:चा रोजगार शोधलाय. रस्त्यावर नोकरीचे अर्ज विकून तरुणांना स्वप्नाकडून सत्याकडे नेणाऱ्या या ‘सौदागरांना’ही आता ५० टक्के तोट्याचा सामना करावा लागतोय.यवतमाळ शहरात पोस्ट आॅफिस चौकात पूर्वी पाच जणांची दुकाने होती. परंतु, आॅनलाईन पद्धतीमुळे मजुरी निघणेही कठीण झाल्याने यातील ३ दुकाने बंदी झाली. तिवारी, पाटील, नगराळे नामक तरुणांना आपली दुकाने दोन वर्षांपूर्वी गुंडाळावी लागली. आता केवळ सिद्धार्थ बनकर आणि काळे यांची दुकाने कशीबशी सुरू आहेत. दररोज साधारण ९०-१०० अर्जांची विक्री करणाऱ्या या दुकानातून आता दिवसाला १५-२० अर्जच जातात. सिद्धार्थ बनकर हा मूळच नेर तालुक्यातला (पिंपरी) शेतकरी. पण पदवीपर्यंत शिकल्यावरही नोकरी न मिळाल्याने त्याने थेट नोकरीचे अर्ज विकण्याचाच व्यवसाय पत्करला. पोस्ट आॅफिसपुढे दिवसभर बसून कसाबसा १००-२०० रुपये तो मिळवतो. गेल्या पाच वर्षांच्या काळात हजारो बेरोजगार तरुणांनी त्याच्याकडून अर्ज नेले. ज्यांना नोकरी मिळाली, त्यातील बऱ्याच जणांनी परत येऊन सिद्धार्थला आवर्जुन धन्यवादही दिले. त्यांच्या स्वप्नांचा सिद्धार्थ साक्षीदार आहे. यात सिद्धार्थचे नुकसानच असते. पण तो म्हणतो, कसेही का होईना, पोरांना नोकरी मिळाली पाहिजे. या सदिच्छेच्या बळावरच तो रस्त्यावर बसूनही दोन मुलांचा संसार यशस्वीपणे सांभाळतोय. बेरोजगारांच्या स्वप्नांना हवा देणारा सिद्धार्थ स्वत:च्याही यशाचे स्वप्न पाहतो. जिल्ह्यातले तरुण ‘होमसिक’जिल्ह्यातील हजारो तरुण नोकरीचे अर्ज सिद्धार्थकडून नेतात. या बेरोजगार मुलांविषयी सिद्धार्थचे निरीक्षण अत्यंत मार्मिक आहे. तो म्हणतो, आपली मुलं खूप महत्त्वाकांक्षी नाहीत. लिपीक आणि शिपाई पदाच्या जागा निघाल्या की, माझ्याकडे अर्ज नेण्यासाठी गर्दी होते. पण उच्च पदांसाठी फार गर्दी नसते. त्या पदांची भरती कदाचित आॅनलाईनही होत असावी. दुसरे असे की, आपल्याच ‘प्रॉपर’च्या जागा निघाल्या की, भराभर अर्ज खपतात. पण बाहेर जिल्ह्यातल्या जागा असल्या तर काही मोजकेच तरुण फॉर्म नेतात. आजचे तरुण होमसिक झाले आहे.