शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

अजब-गजब प्रेमविरांनी वर्षभर पोलिसांना पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 22:11 IST

प्रेमाचा बनाव करून एका तरुणाने चक्क आपण सुंदर तरुणी असल्याचे साेंग घेतले. यवतमाळातील या तरुणाने दिल्लीतील श्रीमंत डाॅक्टरला मुलीच्या आवाजात फोन करून त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. स्वत:वरचे प्रेम सिद्ध करण्यासाठी या नकली ‘तरुणी’ने डाॅक्टरकडून चक्क दोन कोटी रुपये उकळले. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला, त्यावेळी आरोपी तरुणी नसून, धडधाकट तरुण असल्याचे कळताच सर्वांची बोबडी वळली.

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रेम दोन व्यक्तींना जवळ आणते. त्यातून भांडणतंटे मिटतात, वैर संपते. मात्र, प्रेमाचे गैरअर्थ काढून अनेकजण प्रेमाच्याच नावाखाली गुन्हे करू लागले आहेत. त्यामुळे प्रेमप्रकरणातून वाढलेल्या वादावादीने गेले वर्षभर पोलिसांना इतर गंभीर गुन्ह्यांचा तपास बाजूला ठेवून अशा अजब-गजब प्रेमविरांच्या मागे पळत राहावे लागले. कुठे एकतर्फी प्रेमातून छेडछाड तर कुठे विवाहबाह्य प्रेमप्रकरणातून थेट खुनापर्यंत वाद पोहोचले. सोमवारी जगभरात ‘प्रेम दिवस’ साजरा होत असताना जिल्ह्यात प्रेमाच्या नावाखाली घडलेल्या गुन्ह्यांचा हा संक्षिप्त तपशिल...

शेजारच्या म्हातारीचा फोन वापरून तरुणीला काॅल

तरुणांना हाती मोबाईल येताच आवडत्या तरुणीपर्यंत पोहोचणे सोपे वाटू लागले आहे. त्यातूनच घाटंजी येथील एका महाविद्यालयीन युवतीला चक्क तेलंगणातील तरुणाने एकतर्फी प्रेमातून ऑनलाईन प्रस्ताव पाठविला. गंमत म्हणजे, शेजारी राहणाऱ्या म्हातारीचा मोबाईल त्यासाठी वापरला. जवळपास पाच-सहा महिने त्या तरुणाची ऑनलाईन छेडखानी सहन केल्यानंतर घाटंजी पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. थेट आदिलाबादमध्ये पोहोचून त्या उनाड तरुणाला ताब्यात घेण्यात आले. 

प्रेमाच्या नावाने शिक्षकाने वर्गातच खाल्ला मारयवतमाळ तालुक्यातील एका शाळेत वयस्क शिक्षकाने विद्यार्थिनीला प्रेमाच्या नावाने नादी लावले. प्रेम कसले? शोषण केले. याची कुणकूण गावकऱ्यांना लागताच त्यांनी भरवर्गातच या जोडप्याला नको त्या अवस्थेत पकडले. शिक्षकाला बदडून काढले. विद्यार्थिनी ज्याला प्रेम समजत होती तो शिक्षकासाठी केवळ एक खेळ होता. त्याचा अंत वाईट झाला. गुरुजी सध्या निलंबित आहे. 

कमी वयात प्रेम जडले, प्रशासनाचे दंडुके पडलेगावखेड्यात नकळत्या वयात अनेकजण प्रेमात पडून नको त्या गोष्टी करून बसतात. अशा एका प्रेमवीर जोडप्याचे घरच्या मंडळींनी लग्न ठरवले. मात्र, बालविवाह प्रतिबंध कायदा आडवा आला आणि तहसील प्रशासनाने भर मांडवात पोहोचून लग्न वऱ्हाड्यांचीच धुलाई केली. आधी नेर तालुक्यात ठरलेला हा विवाह लपून-छपून घाटंजी तालुक्यात आयोजित करण्यात आला होता. तोही उधळला गेला.  

वाशिममध्ये घर, पुण्यात प्रेम अन् दिग्रसमध्ये खून

वाशिम जिल्ह्यात लग्न होऊन आलेल्या तरुणीला पुण्यात नोकरी मिळाली. घराबाहेर राहताना विवाहापूर्वीचे प्रेमप्रकरण उफाळून आले. त्यातूनच नवरा-बायकोची फारकतही झाली. मात्र, प्रेम आणि विवाहबाह्य प्रेमाचा संघर्ष उडाला. या विवाहितेला नियोजनपूर्वक दिग्रसमध्ये बोलावून तिचा निर्घृण खून करण्यात आला. तब्बल आठ दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह पोलिसांना सापडला. तर १५ दिवस तपास केल्यानंतर मारेकरी नवरा अडकला.  

पैशासाठी मुलाने मुलगी बनून केले प्रेमाचे नाटकप्रेमाचा बनाव करून एका तरुणाने चक्क आपण सुंदर तरुणी असल्याचे साेंग घेतले. यवतमाळातील या तरुणाने दिल्लीतील श्रीमंत डाॅक्टरला मुलीच्या आवाजात फोन करून त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. स्वत:वरचे प्रेम सिद्ध करण्यासाठी या नकली ‘तरुणी’ने डाॅक्टरकडून चक्क दोन कोटी रुपये उकळले. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला, त्यावेळी आरोपी तरुणी नसून, धडधाकट तरुण असल्याचे कळताच सर्वांची बोबडी वळली. प्रेमासारख्या चांगल्या गोष्टीचा वाईट पद्धतीने वापर केल्यास माणूस गुन्हेगार ठरून जेलमध्ये पोहोचू शकतो, हेच या घटनेतून पुढे आले. 

 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डे