शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिदिनी उठले आंदोलनांचे वादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 22:17 IST

९ आॅगस्टचा क्रांतिदिन हे औचित्य साधून राज्य सरकारचा सरता कालावधी लक्षात घेऊन विविध संघटनांनी प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी आवाज बुलंद केला. रोजीरोटीचा सवाल घेऊन जसे लोक रस्त्यावर उतरले, तसेच शैक्षणिक गुणवत्ता जपण्याच्या इरादा व्यक्त करीत ‘राष्ट्रनिर्माण रॅली’ही काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ९ आॅगस्टचा क्रांतिदिन हे औचित्य साधून राज्य सरकारचा सरता कालावधी लक्षात घेऊन विविध संघटनांनी प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी आवाज बुलंद केला. रोजीरोटीचा सवाल घेऊन जसे लोक रस्त्यावर उतरले, तसेच शैक्षणिक गुणवत्ता जपण्याच्या इरादा व्यक्त करीत ‘राष्ट्रनिर्माण रॅली’ही काढण्यात आली. सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या चळवळी अंतर्गत आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटविण्यात आले. तर आशा सेविका, अंगणवाडीताई, महसूल कर्मचारी आदींच्या विविध मागण्यांनी वातावरण आंदोलनमय केले होते. तर त्याचवेळी काँग्रेसच्या वतीने ‘ईव्हीएम हटाव देश बचाव’चा नारा देत आंदोलन छेडण्यात आले. दैनंदिन जगण्याचे प्रश्न, राजकीय आकांक्षा आणि समाजाभान जपणाऱ्यांनी एल्गार पुकारल्याचे यावेळी दिसून आले.‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ ही मोहीम तीव्र झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी या मोहिमेअंतर्गत यवतमाळात राष्ट्रनिर्माण रॅली काढण्यात आली. जिल्हाभरातून एकत्र आलेल्या नागरिकांची ही रॅली प्रचंड लक्षवेधी ठरली. शिस्तबद्ध वाटचाल आणि गुणवत्ता वाचविण्याचा आक्रोश यामुळे रॅलीने लक्ष वेधून घेतले. राज्य शासनाने अलिकडेच मराठा समाज आणि आर्थिक मागासांना आरक्षण लागू केले. त्यामुळे संविधानाने घालून दिलेली आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून राज्यातील आरक्षणाचे प्रमाण ७८ टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याबद्दल यावेळी आवाज उठविण्यात आला. या राष्ट्रनिर्माण रॅलीमध्ये खुल्या प्रवर्गातील हजारो महिला-पुरुषांसह, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने बसस्थानक चौकात ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आले. ‘ईव्हीएम हटाव देश बचाव’ असे नारे यावेळी देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला यावेळी अभिवादन करण्यात आले. आशा स्वयंसेविकांनी वेतनाच्या मागणीसाठी आयटकच्या नेतृत्वात तिरंगा चौकात आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वात अंगणवाडीतार्इंनी जिल्हा परिषदेपुढे एल्गार पुकारला. त्यांनी मानधनवाढ आणि पेन्शनसाठी जेलभरो आंदोलन केले. किसानसभेने कर्जमाफीसाठी धरणे दिले. आॅल इंडिया युथ फेडरेशनच्या नेतृत्वात २४ लाख रिक्त पदांच्या भरतीसाठी आंदोलन करण्यात आले. शिवाय प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी एक तास जादा काम करून प्रतिकात्मक आंदोलन केले. महसूलप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचाºयांनीही प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी आंदोलन केले. जिकडे जावे तिकडे आंदोलनाचेच वातावरण असल्यामुळे शहरातील दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. यवतमाळ शहरात सर्वत्र आंदोलनमय वातावरण असताना जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळांमधील प्राध्यापकांनीही क्रांतिदिनाचे औचित्य साधून शुक्रवारपासूनच ‘नो पेमेंट नो वर्क’ हे अभिनव आंदोलन सुरू केले. क्रांतिदिनी पुढे आलेल्या मागण्यांवर शासन कोणती भूमिका घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.आदिवासी दिनानिमित्त बाईक रॅलीक्रांतिदिनी सर्वत्र आंदोलने होत असताना आदिवासी समाजबांधवांनीही आपली अस्मिता जपली. ९ आॅगस्ट हा जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी समाजबांधवांनी शुक्रवारी सकाळी यवतमाळ शहरातून दुचाकी रॅली काढली. शहरात फिरल्यानंतर तिरंगा चौकात रॅलीचा समारोप झाला. यावेळी मान्यवरांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :Morchaमोर्चा