शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लासिनात वादळाचे तांडव

By admin | Updated: June 18, 2017 00:54 IST

अचानक आलेल्या प्रचंड वादळाने अवघ्या दहा मिनिटाच्या तांडवात संपूर्ण लासीना जणू उद्ध्वस्त केले.

शेकडो वृक्ष उन्मळले : शंभरावर घरांवरील छत उडाले लोकमत न्यूज नेटवर्क सोनखास : अचानक आलेल्या प्रचंड वादळाने अवघ्या दहा मिनिटाच्या तांडवात संपूर्ण लासीना जणू उद्ध्वस्त केले. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास झालेल्या या वादळाने अनेकांना उघड्यावर आणले. राज्य मार्गावर वृक्ष उन्मळून पडल्याने यवतमाळ-अमरावती मार्गावरील वाहतूक सहा तास ठप्प होती. तर वीज खांब तुटल्याने संपूर्ण परिसरात अंधार पसरला. या वादळात कुणालाही इजा झाली नसली तरी लाखो रुपयांचे मात्र नुकसान झाले. यवतमाळ तालुक्यातील लासीना येथे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास प्रचंड वेगाने वादळ आले. गावकरी सायंकाळच्या जेवणाच्या तयारीत असताना वादळाने घरावरील छप्पर उडून नेले. काही कळायच्या आत हा प्रकार घडल्याने संपूर्ण गावकरी भयभीत झाले. कुणाच्याही घरावर टिनपत्रे राहिले नाही. तर वीज वितरणचे खांब उन्मळून पडल्याने संपूर्ण गाव अंधारात बुडाले. पावसाळी वातावरणात नेमके काय झाले याचाही अंदाज येत नव्हता. रात्री ८ वाजताच्या सुमारास वादळ शांत झाल्यानंतर गाव भूकंप झाल्यासारखे भासत होते. या वादळात अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाल्याने रात्र जागून काढावी लागली. त्यातच पाऊसही कोसळत होता. त्यामुळे अनेकांनी लहान मुलांसह शाळा आणि पक्के घर असलेल्या शेजाऱ्यांचा आश्रय घेतला. दरम्यान या वादळात यवतमाळ-अमरावती राज्यमार्गावरील मोठाली वृक्ष मुळासह उन्महून पडली. त्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला पाच किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. बांधकाम विभाग, यवतमाळ अग्निशमन दल, महसूल प्रशासन, पोलीस दाखल झाले. तब्बल सहा तासाच्या प्रयत्नानंतर राज्य मार्गावर पडलेली झाडे बाजूला करण्यात आली आणि वाहतूक सुरळीत झाली. या वादळात जीवित हानी झाली नाही. मात्र वादळ काय असते याचा अनुभव अनेकांनी घेतला. लासीना गावाजवळील ढाब्यावर वादळामुळे काही नागरिकांनी आश्रय घेतला होता. परंतु संपूर्ण ढाबाच उद्ध्वस्त झाला. मिळेल त्या ठिकाणी नागरिक आश्रय शोधत होते. लासीना बसस्थानकावर यवतमाळला जाण्यासाठी काही प्रवासी झाडाखाली उभे होते. तेवढ्यात वादळ आले. यामुळे या मंडळींनी सुरक्षित जागा शोधण्याचा प्रयत्न चालविला. अवघ्या दोन मिनिटानंतर मोठे झाड उन्मळून पडले. मोठा अनर्थ टळला. तारावर आणि झाडावर टिनपत्रे वादळामुळे उडालेली टिनपत्रे दुसऱ्या दिवशीही वीज तारांवर आणि झाडांवर अडकलेल्या अवस्थेत होती. या वादळात पत्त्याप्रमाणे उडालेल्या टिनपत्रे वाकून गेले. गावात स्मशान शांतता गुरुवारी रात्री झालेल्या वादळाने उद्ध्वस्त झालेला संसार सावरण्याचा प्रयत्न शुक्रवारी गावकरी करीत होते. प्रत्येक घरातील साहित्यांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली होती. प्रत्येकजण आपल्या घरावरील उडालेली टिनपत्रे शोधत होते. दुसऱ्या दिवशी गावात कुणाच्याही घरी चूल पेटली नाही तर रात्री ऐन जेवणाच्या वेळी झालेल्या वादळाने अर्धे गाव उपाशीपोटीच जागे होते. असे झाले नुकसान लासीना येथील खुशाल राठोड, प्रवीण राठोड, कवडू राठोड, सोमला राठोड, शेषराव राठोड, नरहरी दांडेकर, मधुकर सातगळे, बेबीबाई लांबतुरे, बालाजी मानकर, सूर्यभान कासार, नितीन मोकासे, वसंता बोरकर, भगवान जवळकर, मनोहर तेलतुंबडे, मनोज पेंदोर, रवी मानकर, धनराज घोटेकर, निशिगंधा वेळूकार, सुधाकर डोणेकर, निलेश दुधे यांच्यासह शंभर घरावरील टीनपत्रे उडाली. काहींच्या घराची पडझड झाली तर संजय पिसे यांच्या मालकीचा जय भवानी ढाबा, शालिग्राम चंदेल यांचे अवधूत महाराज हॉटेल या वादळात उद्ध्वस्त झाले. पाळण्यातला चिमुकला बचावला लासीना येथील बालाजी मानकर यांच्या टिनपत्र्यातील घराच्या आड्याला पाळणा बांधलेला होता. या पाळण्यात चिमुकला झोपला होता. वादळाला सुरुवात होताच चिमुकल्याला पाळण्यातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेले आणि काही क्षणातच संपूर्ण घरावरील छत उडाले. प्रशासनाची धावपळ लासीना वादळ झाल्याची माहिती मिळताच यवतमाळचे तहसीलदार सचिन शेजाळ, लाडखेडचे ठाणेदार नरेश रणवीर, गटविकास अधिकारी मानकर, मंडळ अधिकारी बकाले, तलाठी मेहरे यांनी लासीनाकडे धाव घेतली. सरपंच अलका कांबळे यांच्यासोबत रात्रीच गावाची पाहणी केली. तर दुसरीकडे राज्य मार्गावर पडलेली झाडे जेसीबीच्या मदतीने काढण्यात आली. प्रशासनाने तत्परता दाखविल्याने अवघ्या सहा तासात हा रस्ता वाहतुकीस खुला झाला.