शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

ढाणकीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By admin | Updated: December 2, 2015 02:46 IST

सततच्या नापिकीने शेतकरी, शेतमजूर आर्थिक संकटात सापडले आहे. मात्र शासनाकडून कोणत्याही उपाययोजना होत नाही.

वाहतूक विस्कळीत : वीज, पीक विमा, धरणाचे पाणी सोडण्याची मागणी ढाणकी : सततच्या नापिकीने शेतकरी, शेतमजूर आर्थिक संकटात सापडले आहे. मात्र शासनाकडून कोणत्याही उपाययोजना होत नाही. विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ढाणकी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांंनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.ढाणकीचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब चंद्रे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात निंगनूर जिल्हा परिषद गटाच्या सदस्य शांता राठोड, बिटरगावचे शिवशंकर पांढरे, ढाणकीचे पंचायत समिती सदस्य रमेश गायकवाड, ब्राह्मणगावचे जिल्हा परिषद सदस्य परमात्मा गरुडे, पंचायत समिती सदस्य मोहन नाईक, दत्तराव पिलवंड, रेखा मुरमुरे, अश्विनी राठोड यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. ढाणकी येथे जुन्या बसस्थानकाजवळ हा रास्ता रोको करण्यात आला. बाळासाहेब चंंद्रे यांनी या आंदोलनाचे पार्श्वभूमी सांगितली. माजी आमदार विजय खडसे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तातू देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश चव्हाण यांनी शेतकरी हितासाठी हा लढा आणखी तीव्र करू असे सांगितले. शेती पंपाला १६ तास सलग वीज पुरवठा करावा, जळालेल्या डीपी त्वरित बसवाव्या, खरीप हंगामाचा पीक विमा त्वरित मंजूर करावा, गाजेगाव-डोल्हारी रस्त्याचे काम त्वरित करावे, उमरखेड ते खरबी रस्त्याचे काम सुरू करावे, हरदडा-ब्राम्हणगाव-बोरी रस्त्याच्या कामाला तत्काळ सुरूवात करावी, ढाणकी येथे १३२ केव्ही वीज वितरण केंद्र सुरू करावे आणि इसापूर धरणातील पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव गायकवाड, छबूराव धोपटे, सुभाष कुचेरिया, भास्कर चंद्रे, अजीज खान पठाण, आनंदराव शेवाळकर, कविता कोकुलवार, शे.इब्राहीम शे. जबीर, बशीर भाई यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांंनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. रस्तारोको दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (वार्ताहर)