यवतमाळ : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी बुधवारी येथील बसस्थानक चौकात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने रस्ता रोको करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाचे हमीदर निश्चित करावे, या व इतर मागण्यांसाठी बुधवारी दुपारी ११.३० वाजता रस्ता रोको करण्यात आले. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेवून नंतर सुटका केली. यावेळी समितीचे अध्यक्ष कृष्णराव भोंगाडे, संजय चाफले, संजय मेश्राम, भरत तोंदवाल, अशोक कपिले, जितेंद्र हिंगासपुरे, मीनाक्षी सावळकर, नीलिमा राऊत, ममता काळे, रेखा काकडे, देवेंद्र बापट आदी सहभागी झाले होते.
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी रास्ता रोको
By admin | Updated: January 12, 2017 00:43 IST