शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शाळासिद्धीत फेल शिक्षकांच्या वेतनवाढी रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 13:46 IST

शासनाने आता शिक्षकांची कार्यक्षमता तपासून थेट रोख दंड करण्यासोबतच त्यांच्या वेतनवाढी रोखण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

ठळक मुद्दे परफॉर्मन्स तपासून रोख दंड करण्याच्याही हालचाली

अविनाश साबापुरे ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : ‘मागता येत नसेल भीक तर मास्तरकी शीक’ असे म्हणत अनेक जण शिक्षकी पेशाकडे सुखाची नोकरी म्हणून पाहातात. मात्र, शासनाने आता शिक्षकांची कार्यक्षमता तपासून थेट रोख दंड करण्यासोबतच त्यांच्या वेतनवाढी रोखण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. संकलित मूल्यमापन चाचणी आणि शाळासिद्धीच्या मूल्यांकनात ‘फेल’ ठरणारे मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यावर कठोर कारवाईसाठी शिक्षण संचालक स्तरावर शास्तीचा मसुदा तयार झाला असून त्यामुळे शिक्षक अस्वस्थ झाले आहेत.केंद्र शासनाने शाळासिद्धीत ‘अ’ श्रेणी मिळविणाऱ्या शाळांची यादी नुकतीच शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविली आहे. त्यात महाराष्ट्रातील केवळ ३१ टक्के शाळा अ श्रेणीत आल्या आहेत. परंतु, ७० हजार ४५६ शाळा ब श्रेणीच्याही खाली आहेत. या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने कठोर पावले उचलण्याची तयारी चालविली आहे.संकलित मूल्यमापन चाचणी आणि शाळासिद्धीत कमी पडलेल्या शाळांची श्रेणी सुधारण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांना समजपत्र दिले जाईल. शाळा निरीक्षकांकडून दर महिन्याला अंतर्गत पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर सत्राच्या अखेरीस दहा महिन्यांचा एकत्रित अहवाल तपासला जाणार आहे. मात्र वारंवार समजपत्र देऊनही कर्मचाऱ्यांनी श्रेणी सुधारणेसाठी प्रयत्नच केला नाही, असा निष्कर्ष एकत्रित अहवालात निघाल्यास कर्मचाऱ्यांना शास्ती केली जाणार आहे. त्यात पहिली ते आठव्या वर्गाला शिकविणाºया शिक्षकाला १०० रुपयांचा दंड, त्यानंतर हंगामी स्वरुपात वेतनवाढ रोखणे, त्यानंतरही सुधारणा न झाल्यास एक वेतनवाढ कायमस्वरुपी रोखली जाणार आहे. तर माध्यमिक शिक्षकांच्या बाबतीत नववी, दहावीचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास प्रथम १०० रुपये दंड, नंतर १ हजार रुपये दंड, त्यानंतर हंगामी स्वरुपात वेतनवाढ रोखणे, अशी तरतूद केली जाणार आहे. निकाल जसजसा खाली येईल, तसतशी दंडाची रक्कम आणि रोखल्या जाणाºया वेतनवाढींची संख्या वाढत जाणार आहे. हा मसुदा अद्याप अंतिम झाला नसून लागूही झालेला नाही. मात्र, शास्तीच्या धास्तीने शिक्षक अस्वस्थ झाले आहेत.शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद पाडण्याचे प्रयत्न केले जात आहे. शिक्षकांना शास्ती करणार मसुदा मी स्वत: शिक्षण संचालक कार्यालयात पाहिला. त्याविरुद्धचा रोष ४ नोव्हेंबरच्या मोर्चात दिसेलच. पण याही पुढे आम्ही केजी टू पीजी असे सर्व शिक्षक एकजुटीने शासनाशी लढाई करू.- मधुकर काठोळे,राज्य समन्वय, शिक्षक समन्वय समिती

टॅग्स :educationशैक्षणिक