शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

शारदा चौकातील मटका अड्ड्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:38 IST

शारदा चौकातील पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर चालणाºया मटका अड्ड्याचे अखेर तेथील रहिवाशांनीच ‘स्टिंग आॅपरेशन’ केले.

ठळक मुद्देरहिवाशांचाच पुढाकार : थेट मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यानिशी तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शारदा चौकातील पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर चालणाºया मटका अड्ड्याचे अखेर तेथील रहिवाशांनीच ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. यातून मिळालेल्या पुराव्यांसह या अवैध व्यवसायाची तक्रार पोलीस अधीक्षक व महानिरीक्षकांमार्फत थेट राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.पांढरकवडा रोडस्थित शारदा चौकात गेल्या कित्येक वर्षांपासून मटका अड्डा चालतो. आतापर्यंत तर अगदी पोलीस चौकीला लागूनच या मटक्याचे काऊंटर होते. मात्र तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी स्वत: या अड्ड्यावर धाड घातली होती. त्यानंतर काही महिने बंद राहिलेला हा अड्डा पुन्हा सुरू झाला होता. नागरिकांची ओरड होते म्हणून हाच अड्डा त्याच भागात थोडा पुढे शिफ्ट करण्यात आला. परंतु मंदिर परिसरात थाटलेल्या या मटका काऊंटरमुळे त्या भागातील ये-जा करणाऱ्या महिला-मुलींना त्रास सहन करावा लागतो. या प्रकाराबाबत त्या भागातील रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र काहीच कारवाई झाली नाही. सदर मटकाबहाद्दर पोलिसांनाही जुमानत नसल्याचे सांगितल जाते. अखेर तेथील नागरिकांनी स्वत:च या मटका अड्ड्याचे छुप्या कॅमेराने ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. प्रत्यक्ष मटका अड्डा सुरू असल्याचे डझनावर फोटो घेवून पुरावा म्हणून हे फोटो व तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री रणजीत पाटील व अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांना सादर करण्यात आली आहे. या तक्रार अर्जावर अन्सार आर. अब्दुल, पी.आर. बढोत, डी.पी. शुल्का, एस.आर. पाली, बी.बी. खान, पी.पी. शेख, एस.एस. पवार, बी.पी. तूरकर, एल. मांडवकर, आर.डी. खरात, शंकर सहारे आदींचा नामोल्लेख आहे.मटक्याचे अनेक काऊंटरशारदा चौक, भोसा रोड व त्या परिसरात मटका, जुगाराचे अनेक काऊंटर आहेत. त्यातून लाभाचे पाट पोलिसांपर्यंत वाहतात. अनेकदा पोलीस केवळ देखाव्यासाठी या अड्ड्यांवर धाडी घालतात. छुटपूट एखाददोघांना ताब्यात घेवून खूप मोठी धाड यशस्वी केल्याचे चित्र निर्माण केले जाते. या मटका व्यावसायिकांना पोलिसातूनच खुले संरक्षण दिले जाते.सूत्रधारांना संरक्षण कुणाचे?अनेकदा धाडी पडूनही मटक्याचे सूत्रधार असलेल्या दोन भावांना हात लावण्याची हिंमत पोेलीस दाखवित नाही. त्याच्याकडे चिठ्ठ्या लिहिण्यासाठी असलेल्या सात-आठ माणसांपैकी धाडीच्या वेळी एक-दोघांना कागदोपत्री अटक करून लगेच सुटका करून दिली जाते. यातून पोलीस व मटका व्यावसायिकाचे संबंध किती मधूर आहेत, हे स्पष्ट होते.जिल्हाभरच मटका-जुगाराचे अनेक अड्डेमटका, जुगाराचे हे अड्डे केवळ शारदा चौक परिसरातच आहेत असे नाही. यवतमाळ शहराच्या अप्सरा टॉकीज, रेल्वे स्टेशन, वडगाव, पिंपळगाव, कॉटन मार्केट चौक, वाघापूर, लोहारा, भोसा रोड, कळंब, पांढरकवडा रोड या भागासह जिल्ह्यात बहुतांश पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार अड्डे राजरोसपणे सुरू आहे. अनेक ठिकाणी तर चक्क पोलीस कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हे अड्डे सुरू आहे. त्यावर धाडी घालण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याशिवाय विविध शाखा-पथके असली तरी प्रत्यक्षात ते ‘प्रामाणिकपणे’ धाडी घालतात काय? हा संशोधनाचा विषय आहे. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार धंदे बंद करण्याबाबत प्रत्येकच क्राईम मिटींगमध्ये सूचना देतात. मात्र, अवैध व्यावसायिक आणि पोलीस यंत्रणासुद्धा आता ‘एसपीं’नाही जुमानत नसल्याचे स्पष्ट होते. शारदा चौकातील मटका अड्ड्याचे खुद्द नागरिकांनीच ‘स्टिंग आॅपरेशन’ करून तर आता पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेलाच आव्हान दिले आहे.पोलिसांच्या धाडी ‘मॅनेज’, शिक्षेचे प्रमाण नगण्यमटका, जुगार अड्ड्यावर पोलिसांकडून टाकल्या जाणाऱ्या अनेक धाडी ‘मॅनेज’ असतात. त्यामुळेच वारंवार कारवाई होऊनही अशा प्रकरणात आरोपींना शिक्षा होत नाही. पोलीस प्रशासनाने अशा प्रकरणातील खटल्यातील शिक्षेचे प्रमाण तपासल्यास सर्व काही पुराव्यानिशी सिद्ध होईल. तेच ते चेहरे पकडले जाऊनही त्यांच्यावर पुढे गंभीर स्वरूपाची कारवाई केली जात नाही. आम्ही इंधन व अन्य वरखर्च (गुन्ह्यांचा तपासखर्च निधी) भागवायचा कसा, असा सवाल करून खाकी वर्दीतून काही जण या मटका जुगाराचे समर्थन करतानाही पाहायला मिळतात.

टॅग्स :Crimeगुन्हा