शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 05:00 IST

२३ फेब्रुवारी रोजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना पूर्वसूचना न देता चाैकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली. ईडीने बेकायदेशीररित्या कारवाई केली आहे. मलिक यांच्याविरोधात सूडबुद्धीने ही कारवाई झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. भाजपच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी शुक्रवारी निषेध आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईविरोधात यवतमाळ जिल्हा महाविकास आघाडीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. केंद्र शासनाकडून तपास यंत्रणेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप करीत अटकेचा निषेध नोंदविण्यात आला.२३ फेब्रुवारी रोजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना पूर्वसूचना न देता चाैकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली. ईडीने बेकायदेशीररित्या कारवाई केली आहे. मलिक यांच्याविरोधात सूडबुद्धीने ही कारवाई झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. भाजपच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी शुक्रवारी निषेध आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील कामारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव घुईखेडकर, काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव जावेद अन्सारी, बाबासाहेब गाडे पाटील, शिवसेनेचे किशोर इंगळे, राष्ट्रवादी महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष सारिका ताजने, जि. प. सदस्य अशोक जाधव, मनीषा काटे, संगीता रामटेके, चेतन राऊत, संगीता विरे, सविता अहिरे, चारूशिला जगताप, आशा साखरशेटे, सुनील खाडे, युवराज जमल, अशोक राऊत, शीतल कोरटकर, बबलू देशमुख, सुनील ढाले, काैस्तुभ शिर्के, अरुणा ठाकूर, अरुणा राठोड, मोहसीन खान यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. 

ईडीची कारवाई तत्काळ मागे घ्या- केंद्र शासनाने दबावतंत्राचा वापर करीत तपास यंत्रणेला आपल्या हाताचे बाहुले केले आहे. ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही, अशा ठिकाणी या दबावतंत्राचा वापर करून बदनामी करण्याचे काम होत आहे. ईडीने केलेली कारवाई बेकायदेशीर असून, ही कारवाई तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस