शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आंतर विद्यापीठ झोन क्रीडा स्पर्धांना राज्यस्तराचाच दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 10:33 IST

झोन स्तरावर होणाऱ्या आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धांना राज्यस्तरीय स्पर्धांचाच दर्जा दिला जावा, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. व्ही.के. ताहीलरमाणी व न्या.एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने १२ डिसेंबर रोजी दिला आहे.

ठळक मुद्देसात वर्षांच्या संघर्षानंतर कबड्डी खेळाडू बनणार पोलीस शिपाई

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : झोन स्तरावर होणाऱ्या आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धांना राज्यस्तरीय स्पर्धांचाच दर्जा दिला जावा, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. व्ही.के. ताहीलरमाणी व न्या.एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने १२ डिसेंबर रोजी दिला आहे.न्यायालयाच्या या निर्णयाने एका खेळाडूला पोलीस शिपाई म्हणून नियुक्ती देण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. प्रकाश प्रभाकर आगीवले असे या खेळाडूचे नाव आहे. सन २०११ मध्ये ठाणे ग्रामीण पोलीस दलात त्याची पोलीस शिपाई पदावर निवड झाली होती. मात्र ऐन नियुक्तीच्या वेळी शासनाच्या ३० मे २००४ च्या निर्णयानुसार आंतर विद्यापीठ स्पर्धांना राज्यस्तरीय स्पर्धांचा दर्जा देता येत नसल्याचे सांगत प्रकाश आगीवले यांना पोेलीस शिपाई पदावरील नियुक्तीसाठी अपात्र ठरविण्यात आले.

मुंबई ‘मॅट’मध्ये धावत्या विरोधात प्रकाश यांनी अ‍ॅड. भूषण बांदिवडेकर यांच्यामार्फत मुंबई ‘मॅट’ मध्ये (महाराष्ट प्रशासकीय न्यायाधीकर) आव्हान दिले. तेथे दीड वर्ष सुनावणी होऊनही ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी शपथपत्र दाखल केले नाही. त्यामुळे ‘मॅट’ने एकतर्फी निकाल देत प्रकाश यांना पोलीस शिपाई पदावर नियुक्ती देण्याचे आदेश दिले.

एकतर्फी निर्णयाला विरोधया निर्णयाला शासनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. निर्णयाची एवढी घाई कशाला, शपथपत्र आल्यावरच निर्णय द्या, असे म्हणून प्रकरण पुन्हा ‘मॅट’कडे वर्ग करण्यात आले. शपथपत्रातील बाजू ऐकल्यानंतर ‘मॅट’ने पुन्हा निर्णय देताना आगीवले यांना पोलीस शिपाई पदावर नियुक्ती देण्याचे आदेश जारी केले. या निर्णयाला पुन्हा उच्च न्यायालयात शासनाने आव्हान दिले.

शासनाचे उच्च न्यायालयात अपीलन्यायालयाने ‘मॅट’च्या निर्णयाला स्थगनादेश दिला होता. गेली पाच वर्ष तेथे हे प्रकरण प्रलंबित होते. अखेर १२ डिसेंबर रोजी न्या. ताहीलरमाणी व न्या. कर्णिक यांनी निर्णय दिला. झोन स्तरावरील आंतर विद्यापीठ स्पर्धा ही राज्यस्तरीय स्पर्धा म्हणूनच गणली जावी, असे स्पष्ट करीत उच्च न्यायालयाने ‘मॅट’चा प्रकाश आगीवले यांना पोलीस शिपाई म्हणून नियुक्ती देण्याचा निर्णय योग्य ठरविला.

नियुक्तीचा मार्ग सूकरया निर्णयामुळे गेल्या सात वर्षांपासून कायदेशीर लढा देत असलेल्या कबड्डी खेळाडू प्रकाश आगीवले यांना पोलीस शिपाई पदावर रितसर नियुक्ती मिळण्याचा मार्ग सूकर झाला आहे. या प्रकरणात सरकारतर्फे अ‍ॅड. ओ.एम. कुळकर्णी यांनी काम पाहिले. आगीवले यांच्यावतीने अ‍ॅड. भूषण बांदिवडेकर व अ‍ॅड. गौरव बांदिवडेकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Sportsक्रीडा