शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

दारव्हा येथे राज्यस्तरीय धम्म परिषद, परिसंवाद

By admin | Updated: January 24, 2016 02:20 IST

येथील मुंगसाजी महाराज महाविद्यालयाच्या प्रांगणात एक दिवसीय राज्यस्तरीय धम्म परिषद घेण्यात आली.

दारव्हा : येथील मुंगसाजी महाराज महाविद्यालयाच्या प्रांगणात एक दिवसीय राज्यस्तरीय धम्म परिषद घेण्यात आली. भदन्त दीपंकर आणि भदन्त काश्यप यांनी यावेळी धम्मदेसना दिली. या परिषदेचे मुख्य आयोजक तथा स्वागताध्यक्ष वसंत घुईखेडकर होते. राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके आदींच्या उपस्थितीत डॉ. रमेश शंभरकर, डॉ. मनिष वानखडे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवी भगत होते. प्रास्ताविकातून स्वागताध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी परिषदेच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. भदन्त दीपंकर व भदन्त काश्यप यांनी तथागतांच्या विचारांचे आचरण केल्याने कुशल कर्माचा संचय होतो, असे सांगितले. ऐतिहासिक दाखल्यांचा संदर्भ देत ज्या-ज्या लोकांनी भिक्खु संघाचा आदर केला, त्याचप्रमाणे ज्या-ज्या लोकांनी धम्म (संगती) परिषदेचे आयोजन केले त्या-त्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या, असे त्यांनी सांगितले. वसंत घुईखेडकर यांनीही धम्म परिषदेचे सातत्याने आयोजन करावे, असे ते म्हणाले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन केले. यावेळी ‘युद्ध नको बुद्ध हवा’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. कल्याण साखरकर होते. डॉ. मनिष वानखडे, कैविसताई मेश्राम यांनी या विषयावर विचार मांडले. परिसंवादाचे संचालन प्रा. खुशाल ढवळे यांनी केले. आभार प्रा. अरविंद मनवर यांनी मानले. सायंकाळी भगवानराव गावंडे यांचा प्रबोधनपर कार्यक्रम झाला. परिषदेला प्राचार्य डॉ. संगीता घुईखेडकर, उपप्राचार्य डॉ. विलास राऊत, प्रा. प्रशांत बागेश्वर, साहेबराव सोनोने, उत्तमराव शेळके, नामदेवराव खोब्रागडे, मोहन भोयर, शरद माहुरे, शिवरामजी कटके, रूपाताई मानकर, सभापती उज्ज्वलाताई बन्सोड, उपसभापती प्रा. सुषमाताई गावंडे, जुमळे, वसंतराव मनवर, बापूराव रंगारी, जयकृष्ण बोरकर, पुंडलिक शेंडे, वसंतराव पाटील, श्रीकांत बोरकर आदी मंचावर उपस्थित होते.यशस्वीतेसाठी प्रा. अजाबराव खंडारे, प्रा. गौतम मनवर, प्रा. पी.एच. भगत, प्रा. रवी बोरकर, प्रा. सिद्धार्थ गायकवाड, प्रा. विजय हटकर, प्रा. अशोक घोडेस्वार, प्रा.डॉ. सुनील चकवे, डॉ. लाडोळे, डॉ. जाधव, प्रा. भिगारे, प्रा. भुरले, प्रा. काझी, प्रा. मोहरील, माधुरीताई गडपायले, प्रा. एस.एस. राऊत, सुधाकर वाकोडे, सुधीर सोनोने, विजय गजभिये, सुनील अगमे, राजू मनवर यांच्यासह मुंगसाजी महाराज विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)