शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील ३९ राष्ट्रीय खेळाडूंना राज्य शासनाची शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 12:50 IST

जिल्ह्यातील ३९ खेळाडूंनी सन २०१८-१९ या सत्रात भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय शालेय स्पर्धेत विविध खेळात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. या राष्ट्रीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने दोन लाख ४४ हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती देऊन त्यांचा गौरव केला.

ठळक मुद्देप्रावीण्य व सहभागाचे बक्षीस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील ३९ खेळाडूंनी सन २०१८-१९ या सत्रात भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय शालेय स्पर्धेत विविध खेळात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. या राष्ट्रीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने दोन लाख ४४ हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती देऊन त्यांचा गौरव केला.राज्य शासनाच्या क्रीडा धोरणानुसार आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीयस्तरावर शालेय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त आणि सहभाग घेणाऱ्या खेळाडूंना वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करून प्रथम क्रमांक खेळाडूंना ११ हजार २५० रुपये, द्वितीय क्रमांक आठ हजार ९५०, तृतीय क्रमांक सहा हजार ७५०, तर सहभागाबद्दल तीन हजार ७५० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.२०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील सात खेळाडूंनी विविध खेळात प्रथम, पाच खेळाडूंनी द्वितीय, तर सात खेळाडूंनी तृतीय क्रमांक प्राप्त करत महाराष्ट्र संघाला पदक प्राप्त करून दिले. २० खेळाडूंनी राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सहभाग घेतला, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी दिली.या खेळाडूंची शिष्यवृत्ती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहे. खेळाडूंशी संबंधित शाळेच्या शिक्षकांनी अर्ज व बँक पासबूकच्या झेरॉक्ससह कार्यालयात संपर्क करून शिष्यवृत्ती प्राप्त करून घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी राठोड यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क करता येईल.

शिष्यवृत्ती प्राप्त खेळाडू१४ वर्षे वयोगट - हर्ष चव्हाण, सानिका रोकडे, अमन राजा, दीप गाबडा, अनुष्का नागरमोथे, मयांक काळे, प्रशांत चव्हाण, वृंदा सोनटक्के, खुशी जाधव, तनुश्री कडू, क्षितिज टोणे, कार्तिकी येंडे.

१७ वर्षे वयोगट - सायली वझाडे, इशाका पाटील, मानसी इखे, नंदिनी पाटील, आरोही भगत, अमितेश बोदडे, अभिलाष टेके, देवांशू बाळबुद्धे, तन्मय पुरके, स्वर पोतदार, तेजस भगत, अंजली गुप्ता, तन्मय पुरके, सेजल जाधव. १९ वर्षे वयोगट - रितेश राऊत, देवयानी नित, हर्षल धाबर्डे, साक्षी शिरसाट, प्राची सोनारकर, राज बागडिया, रेवती कोकरे, हर्षल खामनकर, यशस्विनी कुंथळकर, सुयोग मोरे, नीमिषा राजगुरे.

टॅग्स :Governmentसरकार