शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

१५ दिवसांत वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या माती कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 20:24 IST

वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन रेल्वे मार्गास गती देण्याचा प्रयत्न केला जात असून सोमवारी खासदार भावनाताई गवळी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन संपूर्ण कामाचा आढावा घेतला.

ठळक मुद्देभावना गवळी यांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन रेल्वे मार्गास गती देण्याचा प्रयत्न केला जात असून सोमवारी खासदार भावनाताई गवळी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन संपूर्ण कामाचा आढावा घेतला. त्यात येत्या १५ दिवसांत कळंब ते यवतमाळ दरम्यान रुळ टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या माती कामास प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.खासदार भावनाताई गवळी यांनी वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन रेल्वे मार्गाचे वेगाने काम व्हावे म्हणून रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली. यवतमाळात येथे जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, रेल्वेचे कार्यकारी अभियंता आर.के.धनगर, डेप्युटी चिफ इंजिनियर एच.एल.कावरे यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील या रेल्वे मागार्साठी आवश्यक असलेले जमीन अधिग्रहणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. लवकरच अधिग्रहणाचे हे काम १00 टक्के पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती चंद्रकांत जाजू यांनी दिली.यवतमाळ जिल्ह्यात कळंबपर्यंत गलमगाव, खुटाळा, गंगादेवी, कामठवाडा, एकलासपूर परिसरात माती काम सुरु झाले आहे. येत्या १५ दिवसांत कळंबपासून यवतमाळपर्यंत माती कामास प्रारंभ केला जाणार आहे. यापाठोपाठ जुलै महिन्यापासून यवतमाळ ते दारव्हा व नंतर लगेच दिग्रसपर्यंत माती कामास प्रारंभ केला जाणार आहे. या कामाचे टेंडर काढण्यात येईल. या मार्गावर पुसद तसेच उमरखेड भागात भुयार बांधावे लागणार असून त्याचीही प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे काम सेक्शनवाईज करण्यात येत असल्याने या कामाला गती प्राप्त होत आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड हा प्रकल्प ‘पीएम पोर्टल’वर असूनही प्रकल्पावर कार्यरत कर्मचारी कमी असल्याने त्याची पूर्तता करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचे भावनाताई गवळी यांनी सांगितले.यवतमाळ-आर्णी मार्गावरील एका हॉटेलजवळून ही रेल्वे लाईन जाणार असल्याने तसेच याच ठिकाणावरुन राष्ट्रीय महामार्ग तयार होत असल्याने येणारी समस्या दूर करण्याच्या उद्देशाने आधीच हालचाली करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.रुळ टाकण्यास होईल सुरुवातमाती काम झाल्याबरोबर रेल्वेचे रुळ टाकण्यास सुरुवात केली जाणार आहे. जिल्ह्यातील माती काम येत्या आठ ते दहा महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे विभागाने केले आहे. त्यामुळे यवतमाळकरांच्या स्वप्नातील रेल्वे लवकरच अस्तित्वात येण्याची चिन्हे दिसून येत आहे.प्रकल्पाला गती देण्याच्या सूचनासोमवारी झालेल्या आढावा बैठकीत खासदार भावनाताई गवळी यांनी या प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना रेल्वेसह सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रकल्पाची सध्याची किंमत ३१६८ कोटीपर्यंत पोहोचली आहे. माती काम पूर्ण करुन लवकर रेल्वेचे रुळ टाकण्याची प्रक्रिया प्रारंभ करा, असेही भावनाताई गवळी यांनी अधिकाऱ्यांना सुचविले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेBhavna Gavliभावना गवळी