शिरसगाव पांढरी : एकपात्री प्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम व परिसंवाद शिरसगाव(पांढरी) : नीलचक्र बहुद्देशीय समितीच्यावतीने येथे आयोजित अकराव्या राज्यस्तरीय धम्म परिषदेचे उद्घाटन रविवारी झाले. भदन्त धम्मानंदजी महाथेरो यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. पंचशील ध्वजारोहण, बुद्ध वंदना, धम्मदेसनेने परिषदेला प्रारंभ झाला. यावेळी विचारपीठावर प्रा. दिनकरराव मनवर, अनंत खडसे, अवधुतराव साखरे, प्रा. दीपक अघम, दामोधर एस. खडसे, ह.सु. काळे, हिरामण कटके, विजय गायकवाड, विनायकराव अघम, मोतीरामजी खडसे, संजय वरठी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्वागताध्यक्ष अश्विनी डेरे यांनी केले. संचालन सविता मनवर, तर प्रास्ताविक बाळासाहेब डेरे यांनी केले. समितीचे अध्यक्ष तथा आयोजक प्रमोद अघम आदींची याप्रसंगी उपस्थिती होती. दुपारी १२ वाजता अभियंता दीपक नगराळे यांच्या अध्यक्षतेत परिसंवाद पार पडला. ‘फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा व बौद्ध समाजातील स्त्रियांचे उच्च शिक्षणातील स्थान’ या विषयावरील परिसंवादात उषाताई बौद्ध (नागपूर) यांनी विचार मांडले. यानंतर घाटंजी येथील सतीश रामटेके यांनी ‘अंगुली माल’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत सत्यपाल महाराजांची सत्यवाणी हा सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सोमवार, २६ डिसेंबर रोजी बुद्ध वंदना आणि धम्मदेसना होवून दुपारी १२ वाजता परिसंवादाला सुरुवात होईल. पुणे येथील एकनाथराव रंगारी हे अध्यक्ष आहेत. ‘भगवान बुद्धांचे आर्थिक तत्त्वज्ञान’ या विषयावर डॉ. के.एस. इंगोले (मुंबई) यांचे व्याख्यान होणार आहे. रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. (वार्ताहर)
राज्यस्तरीय धम्म परिषदेला सुरुवात
By admin | Updated: December 26, 2016 01:52 IST