शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक पदभरती तातडीने सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:16 IST

पारदर्शकपणे शिक्षक पदभरती करण्यासाठी राज्य शासनाने अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी घेतली. मात्र, अद्यापही भरती सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे तातडीने पदभरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी थेट शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची मागणी : थेट शिक्षणमंत्र्यांना दिले निवेदन, परीक्षेची उत्तरतालिकाही मिळावी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पारदर्शकपणे शिक्षक पदभरती करण्यासाठी राज्य शासनाने अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी घेतली. मात्र, अद्यापही भरती सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे तातडीने पदभरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी थेट शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.शिक्षण मंत्री विनोद तावडे यवतमाळात आले असता स्पर्धा परीक्षा विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. १२ ते २२ डिसेंबरदरम्यान शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली. मात्र अजूनही शिक्षक पदभरती संदर्भात कुठल्याही प्रकारची हालचाल शासनस्तरावर दिसून येत नाही. त्यामुळे चाचणी दिलेले सर्व अध्यापक संभ्रमावस्थेत आहेत. उत्तरतालिका जाहीर करण्यात आली. परंतु, त्यात विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरांची कुठेही नोंद नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या प्रश्नपत्रिकेची उत्तरांसहीत विद्यार्थ्यांपर्यंत उत्तरतालिका पोहोचवावी, अशी मागणी करण्यात आली.राज्यात २००९-१० पासून शिक्षक पदभरती घेण्यात आलेली नाही. त्यामुळे असंख्य डीएड व बीएड पात्रताधारक विद्यार्थी बेरोजगार आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शिक्षणमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून भरती प्रक्रिया तत्काळ राबवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.निवेदन देतेवेळी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी परिषदेचे आशीष रिंगोले, अभय राऊत, अनिल निम्मलवार, अमन युसूफ खान, गजानन चव्हाण, मनोज साबापुरे, ऋणेश बोरुले, अजय दुबे, अविनाश दिडशे, गणेश पोलचेट्टीवार, प्रतिक भगत, प्रफुल्ल रिंगोले, युवराज आडे, कैलास उलमाले, प्रशांत खरतडे, जगदीश मॅकलवार, अजय चौधरी, सागर भोयर, चेतन हांडे, श्रीकांत गोरे आदी विद्यार्थी उपस्थित होते.