शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

आगीच्या आघातातून सावरत प्रियदर्शिनी सूत गिरणी सुरू

By admin | Updated: June 18, 2015 02:07 IST

सहकारी सूत गिरण्यांना मागील तीन वर्षांपासून आधीच मंदीचा सामना करावा लागत आहे. अशातच प्रियदर्शिनी

साडेतीन कोटींचे नुकसान : ब्लोरुम डिपार्टमेंटमधील यंत्रणा पूर्ववत यवतमाळ : सहकारी सूत गिरण्यांना मागील तीन वर्षांपासून आधीच मंदीचा सामना करावा लागत आहे. अशातच प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीला ३१ मे रोजी रात्री १० वाजून २० मिनिटांनी आग लागली. यात ब्लोरुम डिपार्टमेंट पूर्णत: जळाले होते. कर्मचारी व कामगारांनी अथक परिश्रम करून ही आग इतर भागात पसरण्यापासून रोखली. मात्र यातून मार्ग काढत ब्लोरूम डिपार्टमेंटचे कामकाज सुरू झाले आहे. येत्या दोन दिवसात संपूर्ण स्थिती पूर्वपदावर येईल, अशी माहिती सूत गिरणीचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार कीर्ती गांधी यांनी पत्रपरिषदेत दिली. या आगीत एक कोटी दहा लाखांच्या ६५० रूईगाठी जळून खाक झाल्या तर दीड कोटींचे मशिनरीचे नुकसान झाले. उत्पादन थांबल्यामुळे प्रतिदिवस २० लाखांचे नुकसान सोसावे लागले. तब्बल १६ दिवसानंतर सूत गिरणीने ब्लोरूम डिपार्टमेंट सुरू केले आहे. सूत गिरणीने युनायटेड इंडिया इन्शूरन्स या शासकीय भागीदारी असलेल्या कंपनीची विमा पॉलिसी घेतली आहे. यामधून सर्व जळालेल्या मशीन, बेल्सची (रूईगाठी) रिप्लेसमेंट मिळणार आहे. मात्र कागदपत्राची पूर्तता करून त्याचा लाभ मिळेपर्यंत एक वर्षाचा कालावधी लोटणार आहे. या आगीत उत्पादन थांबल्याने झालेले नुकसान आणि कामगारांचे वेतन भरुन निघणे कठीण आहे. शिवाय सलग तीन वर्षांपासून मंदीची झळ सोसत असलेल्या सूत गिरणी प्रशासनाला हे संकट खरोखरच अडचणीत आणणारे आहे, असे गांधी यांनी सांगितले. प्रियदर्शिनी सूत गिरणीत लागलेली आग हा मंदीच्या काळातील सर्वात मोठा आघात होता. आजही तो दिवस आठवल्यावर सर्वांच्याच अंगावर शहारे येतात. आगीची घटना घडली तेव्हा गिरणीतील जिगरबाज कामगार आणि कर्मचाऱ्यांनी प्रसंगी जीव धोक्यात टाकून आग आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आग विझविण्यासाठी प्रशासनाकडूनही भरपूर सहकार्य मिळाले. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी स्वत: घटनास्थळावर उपस्थित होते. रेमंड समूहाचीही मदत झाली. याशिवाय यवतमाळ, अमरावती, नेर येथील अग्नीशमन बंब पाचारण करण्यात आले होते. रात्री १०. ३० वाजता लागलेली आग दुसऱ्या दिवशी सायंकाळी पूर्णत: विझविण्यात यश आले. मात्र दरम्यानच्या काळात ही आग इतरत्र पसरु नये म्हणून कर्मचाऱ्यांनी व कामगारांनी मोठे परिश्रम घेतले. सहा हजार सभासद असलेली ही सूत गिरणी सर्वांच्या शुभेच्छांच्या पाठबळावर आता पुन्हा सुरू झाली आहे. ज्या भागात आग लागली होती, त्या ब्लोरूम डिपार्टमेंटमधील एक लाईन चार दिवसापूर्वीच सुरू केली. तर दुसरी लाईन बुधवारी सकाळी सुरू करण्यात आली आहे. आता कामगारही पूर्ववत कामावर येत आहे. दोन दिवसात पूर्ण क्षमतेने उत्पादन केले जाईल, असेही गांधी यांनी सांगितले. यावेळी संचालक माणिकराव भोयर, महाव्यवस्थापक डॉ. जे.सी. रघुरामन हे उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)