शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठिय्या आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: November 24, 2014 23:07 IST

भाजपाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात शेतकऱ्यांना लागवड खर्चाच्या अधिक ५० टक्के नफा मिळवून हमीभाव देण्याचे जाहीर केले होते. आता दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता असून,

यवतमाळ : भाजपाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात शेतकऱ्यांना लागवड खर्चाच्या अधिक ५० टक्के नफा मिळवून हमीभाव देण्याचे जाहीर केले होते. आता दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता असून, त्यांनी आपल्या आश्वासनाची पूर्ती केली नाही. शेतकऱ्यांच्या मालाला जाहीर केलेला दर द्यावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांनी पत्रपरिषदेत सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात दाभडी येथे शेतीच्या मुद्यावरच विशेष कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमात उत्पादन खर्चावर अधिक ५० टक्के नफा मिळेल इतका हमीभाव शेतमालाला दिला जाईल असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र या आश्वासनाची पूर्तता शासनाकडून अद्यापही करण्यात आली नाही. शिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार म्हणून काम करताना सातत्याने शेतमालाच्या हमीभावासाठी आग्रही भुमिका घेतली आहे. आता मात्र मुख्यमंत्रीही शेतमालाला त्यांनी मागणी केलेला भाव देण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. २०१४-१५ या वर्षासाठी कृषिमूल्य आयोगाने पिकांचे जाहीर केलेल दर शेतकऱ्यांची फसवणूक करणारे आहेत. कापसाला सहा हजार प्रती क्विंटल आणि सोयाबीनला पाच हजार, धानाला तीन हजार रुपये प्रती क्विंटल दर द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन ३० नोव्हेंबरपासून करण्यात येत आहे, असे चटप यांनी सांगितले. यावेळी जिल्हा संघटक देवेंद्र राऊत, जयंतराव बापट, नितीन देशमुख, रमेश मांगुळकर, इंदरचंद बैद, बालाजी काकडे, द.रा. राजूरकर आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)