शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

मुद्रांक शुल्क अपहारात सात ग्रामसेवक निलंबित

By admin | Updated: January 3, 2015 23:09 IST

येथील पंचायत समितीमध्ये उघडकीस असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मुद्रांक शुल्क अपहार सात ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले असून प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांसह चार अधिकारी

यवतमाळ : येथील पंचायत समितीमध्ये उघडकीस असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मुद्रांक शुल्क अपहार सात ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले असून प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांसह चार अधिकारी कारवाईच्या टप्यात आहेत. १५ ग्रामपंचायतींमध्ये याची तक्रार करूनही जिल्हा परिषदेने सुरूवातीला थातुरमातुर चौकशी केली होती. मात्र नागपूर अधिवेशनात हा अपहार गाजताच जिल्हा परिषद प्रशासन ताळ््यावर आले. सखोल चौकशी केली असता व्याप्ती उघड झाली.यवतमाळ शहरालगतच्या १५ ग्रामपंचायतीमध्ये खरेदी विक्रीच्या व्यहारातून मोठा मुद्रांक शुल्क जमा होतो. २००९ ते २०१२ या वर्षामध्ये गोळा झालेल्या तीन कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्काची परस्परच विल्हेवाट लावल्याची बाब उघड झाली होती. त्यानंतर नागपूर हिवाळी अधिवेशनात दोन आमदारांनी घोटाळ्याचा मुद्दा लावून धरला. त्यामुळे प्रकरण शेकणार असे दिसताच पुन्हा स्वतंत्र चौकशी करण्यात आली. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र विस्तार अधिकारी नियुक्त केले आहेत. त्यापैकी सात ग्रामपंचायतींची चौकशी पूर्ण झाली असून तसा अहवाल जिल्हा परिषदेकडे आला आहे. या प्रकरणात सुरूवातीला सेवानिवृत्त विस्तार अधिकारी प्रल्हाद पारवे, ग्रामसेवक यु.एम. माने, आर.जी. कोराम यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर ग्रामसेवक पी.टी. जाधव, आर.एस. दुधे, एन.बी. शेळके, पी.जी. कांडलकर, सुनील क्षीरसागर यांना निलंबित करण्यात आले. याच प्रकरणात यवतमाळ पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संजय ईश्वरकर, वाशिम जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले बीडीओ विठ्ठल मुनेश्वर, पंचायत विस्तार अधिकारी हेमंत नेवल, सेवानिवृत्त बीडीओ सुधाकर जुगनाके यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)