शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

एसटी कामगारांचा अग्रीमसाठी ठिय्या

By admin | Updated: November 5, 2015 03:05 IST

सण अग्रीम देण्यासाठी रक्कम उपलब्ध होऊनही वितरणास जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचा आरोप करून एसटी

यवतमाळ : सण अग्रीम देण्यासाठी रक्कम उपलब्ध होऊनही वितरणास जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचा आरोप करून एसटी कामगारांनी बुधवारी येथील विभाग नियंत्रक कार्यालयात ठिय्या दिला. अग्रीम देण्यास विलंब होत असल्याचे पाहून कामगार दुपारी ४ वाजताच या कार्यालयावर धडकले. सायंकाळी ६ वाजतापर्यंत यावर कुठलाही निर्णय न घेता वरिष्ठ अधिकारी निघून गेले. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या या अडेलतट्टूपणाविषयी रोष व्यक्त होत आहे. यवतमाळ विभागातील एसटी कामगारांना अग्रीम देण्यासाठीची रक्कम उपलब्ध झाल्याची माहिती कामगारांना मिळाली. ही रक्कम बुधवारी मिळेल, या आशेवर कामगार होते. मात्र यासंदर्भात कुठलाही निर्णय महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने घेतला नाही. दरम्यान, कामगारांनी विविध ठिकाणच्या विभागीय कार्यालयातील सहकाऱ्यांना संपर्क केला. काही ठिकाणी अग्रीम रकमेचे वितरण झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे ते अधिक आक्रमक झाले. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू गाडगे यांच्या नेतृत्त्वात अनेक कामगारांनी अग्रीम मिळण्यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. मात्र त्यांची ही मागणी गांभीर्याने घेण्यात आली नाही. वेतन झाल्यानंतर अग्रीम रकमेचे वाटप केले जाईल, असे काही अधिकाऱ्यांनी कामगारांना सांगितले. त्यामुळे हा प्रश्न अधिकच चिघळला. गुरुवारी या विषयावर पुन्हा अधिकाऱ्यांची भेट घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.यासंदर्भात विभाग नियंत्रक शिवाजी जगताप यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, अग्रीम रकमेचे वितरण करण्यासाठी रक्कम उपलब्ध झाली आहे. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तत्काळ वितरण केले जाईल, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)