शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

एसटीचे आॅनलाईन तिकीट काढले अन् फसले..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:35 IST

आॅनलाईन तिकीट बुक करून बिनधास्त झालेल्या एका एसटी बस प्रवाशाला चांगलाच फटका बसला. चंद्रपूरसाठी यवतमाळ येथून बुकिंग करण्यात आले. गुरूवारी सकाळी ७.४५ वाजता घुग्गुस मार्गे चंद्रपूर जाणारी एसटी बसफेरी रद्द झाली.

ठळक मुद्देप्रवाशांना मनस्ताप : आॅनलाईन बुकिंगचा गोंधळ, खुद्द अधिकारीच अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आॅनलाईन तिकीट बुक करून बिनधास्त झालेल्या एका एसटी बस प्रवाशाला चांगलाच फटका बसला. चंद्रपूरसाठी यवतमाळ येथून बुकिंग करण्यात आले. गुरूवारी सकाळी ७.४५ वाजता घुग्गुस मार्गे चंद्रपूर जाणारी एसटी बसफेरी रद्द झाली. आॅनलाईन तिकीट असलेल्या प्रवाशाला कोणती सुविधा द्यायची, हे माहीत नसल्याने बसस्थानक चौकशी कक्षातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तब्बल एक तास वाया घालवला. शेवटी तक्रारीचा इशारा दिल्यानंतरच त्यांनी मदत करण्याची तसदी घेतली.यवतमाळातील एका कुटुंबाने चंद्रपूर जाण्यासाठी चार आॅनलाईन तिकीट काढले. गुरूवारी सकाळची बसफेरी असल्याने ते वेळेवर बसस्थानकावर आले. मात्र रात्री मुक्कामी येणारी ती बस न आल्याने वेळेवर रद्द झाल्याचे सांगण्यात आले. आॅनलाईन तिकीट घेऊन प्रवासी बसस्थानकावरच्या चौकशी कक्षात पोहोचले. त्यांनी याबाबत कोणतीच मदत करता येणे शक्य नसल्याचे सांगितले. यावर प्रवाशाने चौकशी कक्षातील अधिकाऱ्याला तुमचे बोलणे रेकॉर्ड केले असून त्याची तक्रार करण्याचा इशारा दिला. यामुळे तो अधिकारी - कर्मचारी नरमला. त्याने दुसऱ्या बसमध्ये व्यवस्था करण्याचे मान्य केले. मात्र चंद्रपूर जाणाºया बसमधील वाहक ऐकण्यास तयार नव्हता. लेखी आदेश मिळाल्याशिवाय आॅनलाईन तिकिटावर प्रवाशांना नेणार नाही, अशी भूमिका घेतली. शेवटी चौकशी कक्षातील अधिकाऱ्याने लेखी आदेश दिल्यानंतर ९.४५ वाजता त्या प्रवाशांना चंद्रपूरसाठी एसटी बसमध्ये बसता आले. या संूपर्ण प्रक्रियेत प्रवशांचा हकनाक एक तास वाया गेला. मनस्ताप झाला तो वेगळाच. एसटी अधिकारी कर्मचाऱ्यांनाच आॅनलाईन तिकिटाच्या सुविधेबाबत माहिती नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे.भलेमोठे जाळे असलेल्या रेल्वे प्रशासनात आॅनलाईन तिकिटांचा गोंधळ अनेकदा उडतो. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या ग्रामीण भागातील सेवेतही असा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.भाऊबीजेच्या गर्दीत प्रवाशांचे मनोरंजनभाऊबीजेनिमित्त परगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून यवतमाळच्या बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. या गर्दीमध्येच आॅनलाईन तिकिटांचा गोंधळ उघडकीस आला. या गोंधळानंतर संबंधित प्रवाशाची धावपळ, त्याला उत्तर देण्यास असमर्थ ठरलेले अधिकारी हे चित्र पाहून बसस्थानकावरील गर्दीही अचंब्यात पडली. एसटीच्या कारभाराने सर्वांचे मनोरंजन झाले.आॅनलाईन तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशाची पूर्ण जबाबदारी आमची आहे. कोणत्याही कारणाने बसफेरी रद्द झाल्यास त्याला दुसऱ्या बसमधून प्रवास करता येतो. या प्रकाराबाबत माहिती नाही. चौकशी करून उपाययोजना केली जाईल.- रमेश उईके,आगारप्रमुख, यवतमाळ

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळYavatmalयवतमाळ