शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे अधिकारी बचाव ‘मिशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मानव विकासच्या बसेस जिल्ह्याबाहेर पाठवू नये, असे निर्देश पायदळी तुडविणाऱ्या एसटी अधिकाºयांची वरिष्ठांकडून पाठराखण ...

ठळक मुद्देप्रशासनाची दिशाभूल : मानव विकासच्या बसेस जिल्ह्याबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मानव विकासच्या बसेस जिल्ह्याबाहेर पाठवू नये, असे निर्देश पायदळी तुडविणाऱ्या एसटी अधिकाºयांची वरिष्ठांकडून पाठराखण सुरू आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही दिशाभूल करणारी माहिती पुरविली जात आहे. उमरखेड आणि पुसद आगाराने बाहेर जिल्ह्यात या बसेस पाठविल्या होत्या.ग्रामीण भागातील मुलींना बारावीपर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी गाव ते शाळा प्रवासासाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत एसटी महामंडळाला बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांसाठी प्रती तालुका सात याप्रमाणे ६३ बसेस आहेत. या बसेस जिल्ह्याबाहेर पाठविल्या जाऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहे. तरीही महामंडळाच्या काही आगारातून हे निर्देश पाळले जात नाही.उमरखेड आगाराने १९ जानेवारी २०१९ रोजी एम.एच.४०/क्यू-६०९३ ही बस अकोलासाठी पाठविली. मारवाडी फाटा येथे या बसची तपासणी करण्यात आली. तत्पूर्वी २१ एप्रिल २०१८ रोजी पुसद आगाराची एम.एच.०७/९४३८ या क्रमांकाची मानव विकासची बस औंढानागनाथ (जि.परभणी) येथे पाठविली. मार्गात बाराशीव फाट्यावर ही बस अपघातग्रस्त झाली. यात १३ प्रवासी जखमी झाले होते. एवढेच नव्हे तर, ही बस निकाली झाली आहे. मानव विकास कार्यक्रमांच्या सूचनांचा भंग करून या बसेस जिल्ह्याबाहेर पाठविल्या गेल्या.सदर प्रकरणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा मानव विकास समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून खुलासा मागविला. जिल्ह्याबाहेर बस पाठविणाºया आगार व्यवस्थापकांवर कारवाई करण्याची सूचना केली. मात्र संबंधितांवर कारवाई करण्यात आली नाही. उलट त्यांची पाठराखण करण्यात आली. पुसद आगार प्रकरणात आगार व्यवस्थापकाला पदावनत केल्याचा अहवाल पाठविण्यात आला. वास्तविक याठिकाणी आगार व्यवस्थापकच नव्हते. एका अधिकाऱ्याकडे प्रभार होता. अशावेळी पदावनत कुणाला करण्यात आले हा प्रश्न आहे. उमरखेड प्रकरणात कारवाई सुरू आहे. खोटी माहिती पुरविणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे सर्व एसटी कामगारांचे लक्ष लागले आहे.न्यायालयाचा आदेशमानव विकास बसेसचा गैरवापर थांबविण्याबाबत २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या बसेसचा योग्य वापर व्हावा आणि मानव विकास मिशनच्या सूचनांचा भंग करू नये, असा आदेश न्यायालयाने दिला होता, मात्र याचे पालन केले जात नाही.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ