शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एसटी चालक-वाहकांना ‘काम नाही तरी मिळणार दाम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 01:44 IST

नियमित कामगारांच्या सुट्यांवरील संकट टळले

ठळक मुद्देकोरोना प्रादुर्भाव मागील एक महिन्यापासून पुन्हा वाढत चालला आहे. लॉकडाऊन, संचारबंदी लागू करण्यात येत आहे. शनिवार संध्याकाळ ते सोमवार सकाळपर्यंत सर्वत्र सन्नाटा असतो

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे ‘काम नाही, तर दाम नाही’ धोरण राबवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) काही विभागांतील नियमित चालक-वाहकांसाठी यात थोडी ढील देण्याचा निर्णय घेतला आहे. काम मिळाले नाही, तरी त्यांना पगार दिला जाणार आहे. यायोगे त्यांच्या सुट्यांवरील संकट टळले आहे.

कोरोना प्रादुर्भाव मागील एक महिन्यापासून पुन्हा वाढत चालला आहे. लॉकडाऊन, संचारबंदी लागू करण्यात येत आहे. शनिवार संध्याकाळ ते सोमवार सकाळपर्यंत सर्वत्र सन्नाटा असतो. प्रवासी फिरकत नसल्याने एसटीच्या अनेक बसफेऱ्या रद्द होत आहेत. बसफेऱ्या रद्द झाल्याने बहुतांश नियमित चालक-वाहकांना काम मिळत नाही. परिणामी, त्यांना सुटी टाकून घरी जावे लागते. नियमित कर्मचाऱ्यांना वर्षभरात ४० दिवसांच्या पगारी सुट्या आहेत. कामावर येऊनही कामगिरी न मिळाल्यास या ४० दिवसांच्या सुट्या संपल्यास पुढील सुट्या बिनपगारी होतात. यात या कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. ही बाब टाळण्यासाठी कामगिरी मिळाली नसली तरी, त्यांना पगार दिला जाणार आहे.

महामंडळाच्या अमरावती प्रदेशातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि नागपूर प्रदेशातील वर्धा विभागात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून प्रवाशांची वर्दळ अत्यल्प आहे. शिवाय चंद्रपूर, गडचिरोली या विभागातही गरजेनुसार बसफेऱ्या सोडण्याचे नियोजन केले. यामुळे चालक आणि वाहकांना कामगिरीवर उपस्थित राहूनही काम मिळाले नाही. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना विनाकामगिरी राहावे लागले.

प्रशासनाने स्वत:हून वाहतूक बंद ठेवल्यास उपस्थित असूनही कामगिरी न मिळालेल्या चालक-वाहकांना हजेरी देण्याची तरतूद कामगार करारात आहे. त्याचे पालन काही ठिकाणी होत नाही. अमरावती आणि नागपूर प्रदेशातील नियमित चालक-वाहकांना हजेरी मिळणार आहे.- राहुल धार्मिक, यवतमाळ विभागीय सचिव, एसटी कामगार संघटना.

टॅग्स :Bus DriverबसचालकYavatmalयवतमाळ