शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाची ‘ओव्हर टाईम’वर उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:37 IST

खर्चात बचत करण्यासाठी एसटी महामंडळाचा आटापिटा सुरू असताना यवतमाळ विभागात मात्र उधळपट्टी सुरू आहे. प्रामुख्याने अतिकालीक भत्ता (ओटी) सढळ हस्ते दिला जात आहे.

ठळक मुद्देआर्थिक फटका : मागणी करूनही कमी वेतनश्रेणीचे कामगार वंचित, करारातही डावलले जाते

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खर्चात बचत करण्यासाठी एसटी महामंडळाचा आटापिटा सुरू असताना यवतमाळ विभागात मात्र उधळपट्टी सुरू आहे. प्रामुख्याने अतिकालीक भत्ता (ओटी) सढळ हस्ते दिला जात आहे. काही कामगारांचा ओटी तर त्यांच्या मूळ वेतनाच्या दुप्पट निघत आहे. कमी वेतनश्रेणीच्या कामगारांना बाजूला ठेऊन सुरू असलेला हा प्रकार विभाग नियंत्रकही नियंत्रणात का आणू शकत नाही, असा प्रश्न खुद्द कामगारांमधून विचारला जात आहे.कमी वेतन श्रेणीच्याच कामगारांना अतिकालीक कामगिरी देण्यात यावी, असे महामंडळाचे आदेश आहे. जेणेकरून खर्चात कपात होईल. यवतमाळ विभागात प्रामुख्याने यवतमाळ आगारात मात्र हा आदेश गुंडाळून ठेवण्यात आला आहे. वेतनाचा दर अधिक असलेल्या अनेक चालक-वाहकांना अतिकालीक भत्त्याची कामगिरी वारंवार दिली जात आहे. काही कामगारांना तर १२५ तासांचा अतिकालीक भत्ता मिळालेला आहे. मूळ वेतनाच्या तिप्पट रक्कम या कामगारांनी ओटीतून कमावली आहे. नोव्हेंबर महिन्यात ओटीच्या नावाखाली दिली गेलेली रक्कम महामंडळाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याचे मतही व्यक्त करण्यात आले आहे. पाच हजार ते २५ हजार रुपयांपर्यंतची कमाई काही कामगारांनी नोव्हेंबर महिन्यात केलेली आहे. बहुतांश कामगारांच्या ओटीचे तास ५० पेक्षा अधिक आहे. १३ हजार, १४ हजार, १५ हजार, १६ हजार, १७ हजार, १८ हजार, २५ हजार एवढा ओटी मिळविणाºया चालक-वाहकांच्या वेतनाचा दर नऊ ते बारा हजारपर्यंत (मूळ वेतन) आहे. त्यांच्या अतिकालीक भत्त्याचा दरही २०० रुपयांपेक्षा अधिकच आहे.कनिष्ठ वेतनश्रेणीच्या कामगारांच्या वेतनाचा दर केवळ १०० ते १२५ रुपये इतका आहे. या कामगारांना अतिकालीक भत्त्याची कामगिरी दिल्यास खर्चात मोठी बचत होऊ शकते. शिवाय या कामगारांकडून तशी मागणीही केली जाते. मात्र काही अधिकाºयांकडून वैयक्तिक हितापोटी कमी वेतनश्रेणीच्या कामगारांना डावलले जात असल्याचा आरोप केला जात आहे. प्रासंगिक करार, शैक्षणिक सहल या कामगिरीपासूनही त्यांना वंचित ठेवले जाते. प्रासंगिक करारावर लावलेली कामगिरीही त्यांच्याकडून काढून घेतली जात असल्याचे प्रकारही यवतमाळ आगारात घडत आहेत. आगार व्यवस्थापकाचे यावर कुठलेही नियंत्रण नाही. विभाग नियंत्रकही गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे एसटीच्या नुकसानीचा आकडा फुगतच चालला आहे. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देतील अशी अपेक्षा आहे.विश्रांती रद्दचा नवा फंडाकामगारांचा तुटवडा असल्याचा कांगावा करत विश्रांती रद्दचा नवा फंडा सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, विशिष्ट लोकांचीच विश्रांती रद्द होत आहे. या कामगारांना ड्यूटीवर बोलावून आठ तासांच्या कामगिरीचे अतिरिक्त वेतन याशिवाय शिल्लक सुटीचा लाभ दिला जात आहे. एकीकडे चालक नसल्याने सेवानिवृत्तांना कामावर बोलाविण्याची तयारी महामंडळ करते आहे, तर यवतमाळ आगारात मात्र चालक-वाहकांना वर्कशॉप, कॅश, आरक्षण आदी ठिकाणी कामगिरी देण्यात येत आहे. काही लोकांना तर सलग महिनाभर अशी कामगिरी दिल्याचे प्रकार यवतमाळ आगारात घडले आहे.