शहरं
Join us  
Trending Stories
1
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
2
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
3
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
4
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
5
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
6
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
7
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
8
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
9
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
10
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
11
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
12
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
13
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
14
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
15
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
16
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
17
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
18
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
19
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
20
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव

एस.टी. महामंडळातील अनेक पदे प्रभारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 05:00 IST

महामंडळाच्या उत्पन्नाचा स्रोत असलेल्या वाहतूक विभागाचा कारभारही प्रभारी व्यक्तीवर चालविला जात आहे. विभागीय वाहतूक अधिकारी हे पद गेली अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. शिवाय, विभागीय वाहतूक अधीक्षक (अपराध) या पदालाही प्रभाराचे ग्रहण लागले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहिल्यास प्रवाशांना ताटकळत राहावे लागत नाही. ऐनवेळी फेऱ्या रद्द कराव्या लागत नाही. वेळेवर वाहतूक सुरू   राहते. मात्र जिल्ह्याच्या काही आगारांमध्ये फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. 

ठळक मुद्देनियोजनाचा बोजवारा : प्रमुख जागाही अनेक महिन्यांपासून रिकाम्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात अनेक पदांचा कारभार प्रभारावर हाकला जात आहे. या सर्व प्रकारात नियोजनाचा बोजवारा उडत असतानाच एस.टी.चे आर्थिक नुकसानही होत आहे. प्रभारी व्यक्ती जीव ओतून जबाबदारी पार पडत नसल्याने अनेक कामांचा खोळंबा होत आहे. यामुळे कर्मचारीवर्गही त्रस्त झाला असल्याचे सांगितले जाते. महामंडळाच्या उत्पन्नाचा स्रोत असलेल्या वाहतूक विभागाचा कारभारही प्रभारी व्यक्तीवर चालविला जात आहे. विभागीय वाहतूक अधिकारी हे पद गेली अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. शिवाय, विभागीय वाहतूक अधीक्षक (अपराध) या पदालाही प्रभाराचे ग्रहण लागले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहिल्यास प्रवाशांना ताटकळत राहावे लागत नाही. ऐनवेळी फेऱ्या रद्द कराव्या लागत नाही. वेळेवर वाहतूक सुरू   राहते. मात्र जिल्ह्याच्या काही आगारांमध्ये फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. राळेगाव, वणी याठिकाणी आगार प्रमुख नाही. हे दोनही आगार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. दिवस ढकलण्यापुरता कामगिरी करणारे अधिकारी काही ठिकाणी आहे. बसस्थानक प्रमुख, वाहतूक निरीक्षक, विभागीय लेखागार ही पदेसुद्धा रिक्त आहेत. वरिष्ठांसाठी असलेल्या पदांवर कनिष्ठ दर्जाचे कर्मचारी काम करत आहे. परिणामी महामंडळाची आर्थिक बाजू आणखी दुबळी होत चालली   आहे. वैश्विक महामारी कोरोनाचा मोठा दणका लालपरीला बसला. कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याची सोयही महामंडळाकडे नव्हती. सरकारने पैसा दिल्यानंतर पगार झाले. वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्यानंतर उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. परंतु याविषयात अनेक अधिकारीवर्ग गंभीर नसल्याचे दिसून येते. काही आगारातून अनेक बसफेऱ्या रद्द होतात. अवघ्या पाच ते सात मिनिटांच्या अंतरात एकाच मार्गावर चार ते पाच बसेस धावतात. आठ-दहा प्रवासी घेऊन आगारातून निघालेल्या या बसेसला शेवटच्या थांब्यापर्यंतही पूर्ण प्रवासी मिळत नाही. यात नियोजनाचा अभाव दिसून येतो.

 

टॅग्स :state transportएसटी