शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस येथील एसटी बसस्थानक परिसर बनला समस्यांचे माहेरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:05 IST

शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून दिग्रस येथे बसस्थानक व आगाराची निर्मिती केली. परंतु सध्या हे बसस्थानक समस्यांनी ग्रासलेले आहेत. या परिसरात ठिकठिकाणी खड्डे पडले. त्यात पावसाचे पाणी साचून गटार झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असलेले येथील बसस्थानक माहेरघर बनले आहे. बसस्थानकाच्या परिसरात आणि प्रवेशद्वारातही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यात आता पाण्याचे डबके साचल्याने प्रवाशांंसह बसचालक व वाहकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित अधिकारी मात्र दुर्लक्ष करीत आहे.शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून दिग्रस येथे बसस्थानक व आगाराची निर्मिती केली. परंतु सध्या हे बसस्थानक समस्यांनी ग्रासलेले आहेत. या परिसरात ठिकठिकाणी खड्डे पडले. त्यात पावसाचे पाणी साचून गटार झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. दिग्रस आगारात भंगार बस, जीर्ण बस असून सदर बसनेच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. नियमित वेळेवर बस न सोडण्याचा पराक्रम येथील प्रशासन गाजवित आहे. त्याचा फटका मात्र ग्रामीण प्रवाशांना बसत आहे. बसस्थानक परिसरात अनेक सोई-सुविधांचा अभाव असून याकडे अधिकारी, लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहे.गेल्या काही वर्षांपासून येथे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. डांबरीकरण उखडल्याने खड्ड्यात पाण्याचे डबके साचले. येथील विद्युत खांबावर लाईट आहे पण ते सतत बंद असतात.त्यामुळे रात्रीच्या वेळी बसस्थानकात अंधाराचाच मुक्काम असतो. अंधारात बसूनच काही प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर अतिशय गंभीर बनला आहे. अधिकारीही याकडे लक्ष देत नसल्याने समस्या जैसे थे आहे. बसस्थानकात सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :state transportएसटी