शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे केवळ पुणेसाठीच बुकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 05:00 IST

परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागाने पुणे येथे परतीच्या प्रवासाकरिता आधीच बसेसची व्यवस्था करून ठेवली आहे. दरवर्षी गर्दीचा अनुभव पाहता  ही सोय करण्यात आली असली तरी कोरोनामुळे खूप प्रवासी मिळत नसल्याचे सांगितले जाते. पुणे येथून यवतमाळला येण्यासाठीही महामंडळाने जादा बसेसची सोय केली होती. यवतमाळसह मार्गात असलेल्या थांब्यावरील प्रवासीही या माध्यमातून एसटीला मिळत आहे. गेली काही महिन्यांपासून एसटीची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. 

ठळक मुद्देकोरोनाची भीती : दिवाळीला आलेल्या पाहुण्यांचा परतीचा प्रवास

n  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिवाळी संपल्यानंतर गावी परत जाण्यासाठी पाहुण्यांची धावपळ सुरू झाली आहे. तशी प्रवासाकरिता गर्दी नसली तरी सोईसाठी म्हणून जागांचे आरक्षण करून ठेवले जात आहे. यवतमाळ येथून गावी जाण्यासाठी केवळ पुणेकरिताच आरक्षण केले जात आहे. दररोज ३० ते ३५ प्रवाशांचे बुकिंग होत असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागाने पुणे येथे परतीच्या प्रवासाकरिता आधीच बसेसची व्यवस्था करून ठेवली आहे. दरवर्षी गर्दीचा अनुभव पाहता  ही सोय करण्यात आली असली तरी कोरोनामुळे खूप प्रवासी मिळत नसल्याचे सांगितले जाते. पुणे येथून यवतमाळला येण्यासाठीही महामंडळाने जादा बसेसची सोय केली होती. यवतमाळसह मार्गात असलेल्या थांब्यावरील प्रवासीही या माध्यमातून एसटीला मिळत आहे. गेली काही महिन्यांपासून एसटीची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. दिवाळीची गर्दी कॅश करण्यासाठी यवतमाळ विभागाने बहुतांश मार्गावर आवश्यक तेवढ्या बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. शिवाय ग्रामीण भागातही प्रवासी संख्या वाढल्यास बसफेऱ्या सोडण्यात येत आहे. यासाठी नियोजन केले आहे.

नागपूर, अमरावतीकडे अधिक बसफेऱ्यायवतमाळातून नागपूर आणि अमरावतीकरिता प्रवास करणाऱ्यांची संख्या नेहमीच अधिक राहिली आहे. दिवाळी सुटीनिमित्त प्रवास करणाऱ्यांची यामध्ये भर पडली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढू नये याकरिता अधिक बसेस सोडण्याचा प्रयत्न यवतमाळ विभागाचा राहिला आहे. अकोला, नांदेडसाठीही अधिक फेऱ्या आहेत.

ग्रामीण नागरिकही रोजगाराच्या ठिकाणी दिवाळीनिमित्त आपल्या गावाकडे आलेले ग्रामीण भागातील नागरिकही रोजगाराच्या ठिकाणी जायला निघाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांची गर्दीही नेहमीपेक्षा अधिक वाढत आहे. अशावेळी ग्रामीण भागाकरिताही आवश्यक तेवढ्या फेऱ्या सोडण्याचे नियोजन एसटीने केले. कोविडचे नियम पाळून वाहतूक करण्याचा प्रयत्न आहे. 

खाजगी ट्रॅव्हल्सना मिळत आहे संमिश्र प्रतिसादएसटी महामंडळाच्या लालपरी सोबतच नागरिक खासगी ट्रॅव्हल्सनेही प्रवास करीत आहे. ट्रॅव्हल्सला शासनाने अलिकडेच पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली आहे. त्यामुळे ही वाहने आता रस्त्यावर दिसू लागली आहे. यवतमाळ येथून सद्यस्थितीत दहा ते बारा खासगी ट्रॅव्हल्स पुणेसाठी धावत आहे. वैयक्तिक वाहनांना पसंतीएसटी किंवा ट्रॅव्हल्सने प्रवास करणे बहुतांश नागरिक टाळत असल्याचे दिसून येत आहे. खासगी वाहनांद्वारे प्रवास करण्याकडे त्यांचा कल आहे. चारचाकी, दुचाकीद्वारे प्रवास करणे सुरक्षित मानले जात आहे. या वाहनांच्या विक्रीतही मागील काही काळात वाढ झाली आहे. एका दुचाकीवर दोन जण प्रवास करीत आहे. गर्दीतून प्रवास करण्यापेक्षा खासगी वाहनांद्वारे प्रवास करणाऱ्यांची संख्या अलिकडे वाढली आहे. 

 

टॅग्स :state transportएसटी