शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

फुबगाव, घनापूर पुनर्वसनाला वेग

By admin | Updated: February 8, 2017 00:23 IST

डोल्हारी-टाकळी मध्यम प्रकल्पातील बाधित फुबगाव आणि घनापूर या गावांच्या पुनर्वसनाच्या कामाला चांगला वेग आला आहे.

अधिकाऱ्यांचा पुढाकार : डोल्हारी-टाकळी प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची मागणी मुकेश इंगोले   दारव्हा डोल्हारी-टाकळी मध्यम प्रकल्पातील बाधित फुबगाव आणि घनापूर या गावांच्या पुनर्वसनाच्या कामाला चांगला वेग आला आहे. घनापूरची जागा निश्चित झाली असून संयुक्त मोजणीसुद्धा आटोपली तर फुबगावसाठी योग्य जागा शोधण्याचे काम सुरू आहे. बऱ्याच कालावधीनंतर पुनर्वसन कार्याला वेग आल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गणेश राठोड यांनी या कामाला प्राधान्य दिले. त्याचबरोबर पुनर्वसनाकरिता अभियंता एस.पी. पवार यांची नियुक्ती केली. त्यामुळे ही प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून लवकरच दोन्ही गावच्या नागरिकांना योग्य ती जागा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डोल्हारी-टाकळी प्रकल्पाला २४ आॅक्टोबर २००८ ला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. प्रकल्पाची प्रारंभिक किमत १२२.१५ कोटी होती. त्यानंतर दरवाढीमुळे ती २३३.८७ कोटी करण्यात आली. अडाण नदीवर डोल्हारी व उदापूर या गावाजवळ प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पात दारव्हा तालुक्यातील फुबगाव, घनापूर तर नेर तालुक्यातील उदापूर ही गावे पूर्णत: बाधित होणार आहे. एकतर प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे तर दुसरीकडे गावांच्या पुनर्वसनाकडे पाहिजे तेवढे लक्ष दिल्या जात नव्हत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी होती. परंतु या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाल्यानंतर गणेश राठोड यांनी या कामाकरिता पुढाकार घेतला. तसेच पुनर्वसन कार्यासाठी अभियंता एस.पी. पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे सध्या या कार्याला चांगला वेग आला आहे. गावकऱ्यांच्या मागणीनुसार घनापूरकरिता दारव्हा शहरालगत अत्यंत सोयीच्या जागेची निवड करण्यात आली. या गावची पूर्णत: बाधित संख्या ४७७ असून त्याकरिता २२ हेक्टर जागेची आवश्यकता होती. जागा निश्चितीकरिता घनापूरकरांची मागणी आणि शहरालगतच्या शेतकऱ्यांची पुनर्वसनासाठी महागडी शेती देण्याच्या तयारीसाठी अभियंता एस.पी. पवार यांनी मेहनत घेतली. फुबगावसाठी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन जागेचा शोध सुरू आहे. दोन जागा पाहण्यात आल्या. त्यापैकी एक निश्चित करून फुबगावची देखील पुनर्वसन प्रक्रिया मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.