लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा पोलीस दलातील १५ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक यांच्याकडून प्रदान करण्यात आलेले विशेष सेवा पदक जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी बहाल केले. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणानंतर हा गौरव सोहळा पार पडला.नक्षलग्रस्त भागात समाधानकार सेवा पूर्ण केल्याबाबत पोलीस महासंचालकांकडून विशेष सेवा पदक दिले जाते. यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत असलेल्या १५ अधिकाऱ्यांनी गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये आपली सेवा बजावली. त्याबद्दल हे विशेष सेवा पदक देण्यात आले. यामध्ये वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, नेर ठाणेदार पितांबर जाधव, जिल्हा वाहतूक शाखा प्रमुख अनिल किनगे, ठाणेदार विजय राठोड, पोलीस निरीक्षक मनोज केदारे, घाटंजी ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला, अवधूतवाडी ठाणेदार आनंद वागतकर यांचा समावेश आहे. तर सहायक पोलीस निरीक्षक राजू साळवे, सतीश चवरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश इंगळे, रामदास नेवारे, योगेश इंगळे, मंगेश भोयर, सचिन पवार, मंगेश भोंगाडे या अधिकाºयांचा समावेश आहे. त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते हे विशेष सेवा पदक बहाल करण्यात आले. संघर्षातून मिळविलेल्या या यशाने पोलीस अधिकाºयांचे मनोबल आणखी वाढले आहे.राठोड यांना राष्ट्रपतींचे गुणवत्ता सेवा पदकस्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सहायक फौजदार साहेबराव राठोड यांना राष्ट्रपतींचे गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे. याबद्दल त्यांचा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सत्कार केला. राठोड यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासोबतच एक अॅथ्लेटीक्स म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
जिल्ह्यातील १५ पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST
१५ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक यांच्याकडून प्रदान करण्यात आलेले विशेष सेवा पदक जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी बहाल केले. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणानंतर हा गौरव सोहळा पार पडला. नक्षलग्रस्त भागात समाधानकार सेवा पूर्ण केल्याबाबत पोलीस महासंचालकांकडून विशेष सेवा पदक दिले जाते.
जिल्ह्यातील १५ पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक
ठळक मुद्देमहासंचालकांकडून दखल : प्रजासत्ताक दिनी एसपींच्या हस्ते प्रदान