शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या आरोग्यावर चटपटीत आक्रमण

By admin | Updated: January 10, 2016 02:53 IST

शुद्धतेची कोणतीच नोंद नसलेल्या चटपटीत पदार्थांनी ग्रामीण आरोग्याची चव बिघडविली आहे. ‘नॉन ब्रॅण्डेड’ पदार्थांची खुलेआम विक्री होत आहे.

अन्न व औषधी प्रशासन गाफील : अप्रमाणित खाद्यपदार्थांची विक्रीविवेक ठाकरे दारव्हाशुद्धतेची कोणतीच नोंद नसलेल्या चटपटीत पदार्थांनी ग्रामीण आरोग्याची चव बिघडविली आहे. ‘नॉन ब्रॅण्डेड’ पदार्थांची खुलेआम विक्री होत आहे. रंगीबेरंगी पदार्थांनी विशेषत: मुलांवर गारुड केल्याने आणि पालकही जागृत नसल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, उघडपणे सुरू असलेल्या या गैरप्रकाराबाबत अन्न व औषध प्रशासन पूर्णत: गाफील आहे.या पदार्थांवर ‘एक्सपायरी डेट’ नाही, यात वापरण्यात आलेल्या अन्नघटकांची नोंद नाही. तरीही या घातक पदार्थांच्या विक्रीतून जिल्ह्यात महिन्याकाठी कोट्यवधीची उलाढाल बिनदिक्कत सुरू आहे. ग्रामीण परिसरात परवानाधारक दुकानांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. सर्वच दुकानांमध्ये दर्शनी भागातच ठेवलेली रंगीबेरंगी खाद्यपदार्थांची पाकिटे मुलांना पटकन् आकर्षित करतात. यात विविध रंगांच्या गोळ्या, चॉकलेट्स, बिस्किटे, सोनपापडी, चकल्या, गुलाबजामून, पेढा, चिप्स, टोस्ट यासह विविध पदार्थांचा समावेश असतो. ग्रामीण भागात कोणतेही ‘ब्रॅण्ड नेम’ नसलेल्या खाद्यपदार्थांचा वापर जास्त होत आहे. याशिवाय, हे खाद्यपदार्थ बेसुमार खपविण्यासाठी मुलांना आकर्षित करणारी स्वस्त व ‘चायना मेड’ खेळणी भेट स्वरुपात दिली जातात. भारतीय खाद्यसुरक्षा व मानक प्राधिकरणांतर्गत मानवासाठी बनविल्या जोणाऱ्या प्रत्येक खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या संस्था, कंपन्यांची अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंद असणे आवश्यक आहे. तपासणीनंतरच परवाना दिला जातो. पदार्थ बनविल्याची तारीख, अंतिम मुदत, पदार्थामध्ये वापरण्यात आलेल्या वस्तू याबाबतचा उल्लेख उत्पादनाच्या पॅकिंगवर असणे बंधनकारक आहे. मात्र, हे सर्व नियम धाब्यावर बसवून ग्रामीण भागात ‘नॉन ब्रॅण्डेड’ पदार्थ विकले जात आहेत. ब्रॅण्डेड पदार्थांवर दुकानदारांना नफा कमी मिळत असल्याने व नॉन ब्रॅण्डेड पदार्थांवर अधिक कमिशन मिळत असल्याने बेसुमार विक्री वाढली आहे. नफेखोरीच्या या जंजाळात ग्रामीण मुलांचे आरोग्य तोट्यात जात आहे.