ऑनलाईन लोकमतयवतमाळ : रंगोत्सवात बेधुंद होऊन रंगाचा बेरंग करणाऱ्यांना पोलिसांनी चाप लावला. होळी व रंगपंचमी सण शांततेत व सुरक्षित वातावरणात व्हावा, यासाठी गुरूवारपासून संपूर्ण शहर व जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त तैनात होता. खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरले होते. सुरुवातीला त्यांनी खासगी वाहनाने ‘सिव्हील’मध्ये शहराचा फेरफटका मारला. डोळ्यादेखत गोंधळ सुरू असताना आरामात बसलेल्या पोलिसांना एसपींनी चांगलेच फटकारले. खुद्द एसपी रस्त्यावर उतरल्याचा संदेश सर्वत्र पोहोचल्याने जिल्हाभरातील पोलीस यंत्रणा टाईट झाली होती. त्याचा परिणाम धुलीवंदन शांततेत पार पडण्यावर झाला. एरव्ही काहीना काही प्रमाणात रक्तरंजित होळीचा इतिहास असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारची होळी व शुक्रवारचे धुलीवंदन सर्वत्र शांततेत पार पडले. याचे श्रेय एसपी एम. राज कुमार यांच्या नेतृत्वातील तमाम पोलिसांना व खाकी वर्दीतील पोलीस पाहून संयम बाळगणाºया तरुणाईला दिले जात आहे.
होळी बंदोबस्तासाठी एसपी उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 21:58 IST
रंगोत्सवात बेधुंद होऊन रंगाचा बेरंग करणाऱ्यांना पोलिसांनी चाप लावला. होळी व रंगपंचमी सण शांततेत व सुरक्षित वातावरणात व्हावा, यासाठी गुरूवारपासून संपूर्ण शहर व जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त तैनात होता.
होळी बंदोबस्तासाठी एसपी उतरले रस्त्यावर
ठळक मुद्देधुलीवंदन शांततेत : बेधुंदीला पोलिसांचा चाप