शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

एसपींनी घेतला एलसीबीचा ‘क्लास’

By admin | Updated: June 19, 2015 02:02 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी गुरुवारी डिटेक्शनच्या दृष्टीने जिल्ह्यात अत्यंत महत्वाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेतील....

‘डिटेक्शन’च्या टिप्स : अवैध धंदे बंद करा, चुकीची कामे करू नका यवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी गुरुवारी डिटेक्शनच्या दृष्टीने जिल्ह्यात अत्यंत महत्वाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी) पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला. शहरातील बोरेले ले-आऊटमध्ये बुधवारी रात्री आठ लाखांची घरफोडी झाली. त्याच दिवशी धामणगाव रोडवर भरदिवसा सव्वा लाखांचे मंगळसूत्र लुटले गेले. बसस्थानकावर बॅगला चिरा मारुन रक्कम पळविली. नुकताच पुसदमध्ये दहा लाखांचा सशस्त्र दरोडा पडला. एका पाठोपाठ या घटना घडत असताना त्या उघडकीस आणण्यात पोलीस यंत्रणा सातत्याने अपयशी ठरत आहे. याबाबतचे ‘डिटेक्शन’वर चिंता व्यक्त करणारे वृत्त ‘लोकमत’मधून उमटताच अखिलेशकुमार सिंह यांनी गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि अधिनस्त विविध पथकांच्या प्रमुखांचा आपल्या कक्षात बोलावून क्लास घेतला. एलसीबी ही ‘डिटेक्शन’च्या दृष्टीने वेगळे महत्व असलेली शाखा असल्याने डिटेक्शन वाढविण्याचे निर्देश दिले गेले. कोणत्याही परिस्थितीत अवैध धंदे चालणार नाही याचा पुनरूच्चार सिंह यांनी करताना चुकीचे काम होऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली. ‘एलसीबी ही थेट एसपींची ब्रँच म्हणून ओळखली जाते’ असे सांगून सिंह यांनी उपस्थित पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना डिटेक्शनबाबत गंभीर राहण्याचे सुचित केले. यावेळी या कर्मचाऱ्यांना तपासाबाबत आणि गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आपल्या अनुभवातून एसपींनी काही टिप्स्ही दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिनस्त सहायक निरीक्षक कडू, पुंडगे, लष्करे, पतिंगे व फौजदार वाटाणे यांच्या नेतृत्वात पथके कार्यरत आहेत. या पथकांना गती वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. बंदोबस्ताची जबाबदारी नसलेल्या एलसीबीकडून नियमित डिटेक्शन अपेक्षित आहे. मात्र पाहिजे त्या गतीने ते होताना दिसत नाही. आजच्या घडीला या शाखेकडे सुमारे पाऊणशे गुन्ह्यांचा तपास असल्याचे सांगितले जाते. हा आकडा कमी दिसावा म्हणून एक ते दीड वर्षांपासून प्रलंबित प्रकरणात ए फायनल पाठवून फाईली निकाली काढण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)