८० हजारांचे नुकसान : अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल विडूळ : सोंगणी करून गंजी लावून ठेवलेल्या सोयाबीनला अज्ञात इसमाने आग लावून दिल्याची घटना उमरखेड तालुक्यातील विडूळ येथे गुरूवारी सकाळी उघडकीस आली. यात शेतकऱ्याचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विडूळ येथील कांता अमृतराव जोशी यांच्या शेतात सोयाबीनची कापणी करण्यात आली होती. या सोयाबीनचा ढीग मक्तेदार गंगाधर करकले यांनी शेतात लावून ठेवला होता. मळणी यंत्र मिळाले नसल्याने दोन दिवसांपासून शेतातच हा ढीग होता. परंतु बुधवारच्या रात्री अज्ञात इसमाने या सोयाबीनच्या गंजीला आग लावून दिली. यात सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार कांता जोशी यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. (वार्ताहर)
सोयाबीनच्या गंजीला लावली आग
By admin | Updated: October 16, 2015 02:20 IST