शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अन् जावयाने सासऱ्याला पत्नीसमोरच मारहाण करीत केले ठार; यवतमाळमधील थरारक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2022 16:52 IST

ही खुनाची घटना उघड झाली तर पोलीस तुझ्या पतीला अटक करतील, पुढे तुझे काय होईल, अशा स्वरूपाचा दबाव अनिता आडे हिच्यावर टाकण्यात आला.

ठळक मुद्देघटना लपविण्याचा केला प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपीला अटक

यवतमाळ : सालगडी म्हणून शेतावर राहणाऱ्या युवकाने स्वत:च्या सासऱ्याचाच काठीने बेदम मारहाण करून खून केला. पत्नीसमोरच तिच्या वडिलांना ठार करून नंतर ही घटना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता थरारक घटना घडली. बुधवारी सासऱ्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. याची गोपनीय माहिती घाटंजी पोलिसांना मिळाली. त्यांनी या प्रकरणातील आरोपीला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला.

दत्ता बापूराव मरापे (६५), रा. चिखलवर्धा, ता. घाटंजी असे मृताचे नाव आहे. दत्ता मरापे हे जावई रवींद्र रामदास आडे (२८), रा. पाटापांगरा यांच्यासोबतच पांढुर्णा रोडवरील शेतात राहत होते. रवींद्रची पत्नी अनिता व तिचे वडील दत्ता मरापे हे मंगळवारी सायंकाळी चर्चा करीत बसले होते. त्यावेळी रवींद्र आडे हा आला व त्याने पत्नीला मारहाण सुरू केली. जावई मुलीला मारतोय हे पाहून दत्ता मरापे धावून आले. चवताळलेल्या रवींद्रने सासऱ्यावरच काठीने प्रहार करणे सुरू केले. यात दत्ता मरापे यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, ही खुनाची घटना उघड झाली तर पोलीस तुझ्या पतीला अटक करतील, पुढे तुझे काय होईल, अशा स्वरूपाचा दबाव अनिता आडे हिच्यावर टाकण्यात आला.

ती सर्वांपुढे चूप हेाती. मात्र, पतीने केलेल्या कृत्याचा तिला प्रचंड संताप आला होता. पोलिसांत जाण्यापूर्वीच दत्ता मरापे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. चिखलवर्धा येथे त्यांचा मृतदेह पाठविण्यात आला. मात्र, घाटंजी ठाणेदार मनीष दिवटे यांना गुन्ह्याची माहिती मिळताच त्यांनी पोलीस पथक चिखलवर्धा येथे पाठविले. तेथून मृतदेह घाटंजीत आणण्यात आला. वैद्यकीय तपासणीमध्ये दत्ता मरापे यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे उघड झाले.

अनिता रवींद्र आडे हिनेही पोलिसांपुढे आपबीती कथन केली. चुगल्या करतो या कारणावरून पती रवींद्रने बेदम मारहाण केली, यातच वडिलांचा मृत्यू झाल्याची तक्रार अनिताने दिली. त्यावरून पोलिसांनी रवींद्र आडे याला अटक केली. त्याच्यावर कलम ३०२, ३२३, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास ठाणेदार मनीष दिवटे यांनी केला. आरोपीकडून रक्ताने माखलेले कपडे, गुन्ह्यातील काठी जप्त केली. न्यायालयाने रवींद्र आडेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

अंत्यसंस्काराची तयारी अन् पोहोचले पोलीस

सासऱ्याचा खून केल्यानंतर आरोपी रवींद्र आडे याने पत्नीवर दबाव टाकला. भईतीपोटी ती काहीच बोलली नाही. याचा फायदा घेत सासऱ्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. दरम्यान, चिखलवर्धा येथे पोलीस पोहोचल्याने बिंग फुटले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ