शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षण न करताच मृदा आरोग्य पत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 21:56 IST

मातीचे परीक्षण न करताच, संबंधित शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्याचा धक्कादायक प्रकार वणी तालुक्यात पुढे आला आहे. या प्रकारामुळए शेतकरी चक्रावून गेले आहेत. यवतमाळ येथील कृषी चाचणी प्रयोग शाळेतून या पत्रिका प्राप्त झाल्या आहेत.

ठळक मुद्देधक्कादायक प्रकार : मातीचे नमुने घेतलेच नाहीत, शेतकरी संभ्रमात

विलास ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कशिंदोला : मातीचे परीक्षण न करताच, संबंधित शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्याचा धक्कादायक प्रकार वणी तालुक्यात पुढे आला आहे. या प्रकारामुळए शेतकरी चक्रावून गेले आहेत. यवतमाळ येथील कृषी चाचणी प्रयोग शाळेतून या पत्रिका प्राप्त झाल्या आहेत.महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे मोफत परीक्षण करून दिले जाते. त्यानुसार, यावर्षीदेखील ही मोहिम राबविण्यात आली. मात्र वणी तालुक्यातील मेंढोली या गावातील शेतकऱ्यांना नवाच अनुभव आला. या परिसरातील कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतातून मातीचे संकलन न करता, तपासणी करण्यात आल्याचे दाखवून मृदा आरोग्य पत्रिका देण्याचा प्रकार घडला. नियमानुसार, हंगामापूर्वी म्हणजेच मे किंवा जून महिन्यात मातीचे संकलन व परीक्षण करून त्याचा अहवाल शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असते. परंतु देण्यात आलेल्या आरोग्य पत्रिकांमध्ये माती संकलन चक्क आॅगस्ट महिन्यात करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे आॅगस्ट महिन्यात शेतांमध्ये पीक उभे असते.मेंढोली येथील अनेक शेतकऱ्यांना नुकत्याच मृदा आरोग्य पत्रिका मिळाल्या. सदर मृदा आरोग्य पत्रिका पाहताच शेतकऱ्यांना धक्काच बसला. दिवसेंदिवस अधिक उत्पन्न घेण्याच्या उद्देशाने शेतीत रासायनिक खतांसह पाण्याचा अनिर्बंध वापर होत आहे. परिणामी जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे मृदेचे आरोग्य चांगले राखण्याच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने राष्ट्रीय शेती अभियानाअंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका योजना सन २०१५-१६ पासून राज्यात राबविल्या जात आहे.त्याद्वारे सर्व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका तपासणी करून द्यावयाची आहे. या पत्रिकेद्वारे शेतकऱ्यांना जमिनीची रासायनिक गुणधर्म स्थिती, अन्नद्रव्यांची पातळी आणि कमतरता माहित होते. त्यानुसार विविध पिकांसाठी मिश्र व संयुक्त खतांची मात्रा ठरवता येते.मृदा आरोग्य पत्रिका टाकल्या पानटपरीवरगंभीर बाब ही की, या बनावट मृदा आरोग्य पत्रिका संबंधित कर्मचाऱ्याने चक्क मेंढोलीतील एका पानटपरीवर ठेवल्या. अनेक दिवस त्या तेथेच पडून होत्या. त्यामुळे अनेकांना त्या पत्रिका मिळाल्यादेखील नाही.यवतमाळ येथील अ‍ॅग्रीकल्चर टेस्टींग लॅबोरटरीकडून मृदा आरोग्य पत्रिका आम्हाला नुकत्याच मिळाल्या. त्यावर मृदा संकलनाची तारीख ६ आॅगस्ट नमूद करण्यात आली आहे. मात्र या तारखेला माझ्या शेतातून संबंधित विभागाने मृदा परीक्षणासाठी मृदा नमूना संकलीत केली नाही. याबाबत चौकशी व्हावी.- दिवाकर पंधरे, शेतकरी, मेंढोली

टॅग्स :Farmerशेतकरी