सर्वधर्मसमभाव सभा : सर्वांना समान अधिकार, समान संधीयवतमाळ : सामाजिक ऐक्य पंधरवड्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात सर्वधर्म समभाव सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला विविध धर्माचे तसेच अनेक भाषा बोलणारे मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमास जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, आॅनररी कॅप्टन अरूण मोटके, श्याम जोशी, महम्मद आसीफ अली, राजू जॉन, अॅड. बदनोरे, प्रदिपसिंग नन्नरे आदी उपस्थित होते. विविध प्रदेशातील अनेक धर्माच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना वृद्धिंगत करून हिंसाचार टाळणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी भारत हा विविध जाती धर्माचा देश असून सर्वांगाने स्वतंत्र असलेले आपण नागरिक आहो. सर्वांना समान अधिकार आहे. त्यामुळे सर्वांना देशात समान संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले. आपसातील मतभेद विसरून अनेक धर्माच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांनी ऐक्याची भावना वाढीस लावले पाहिजे, असे सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी एकनाथ बिजवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विभा घोडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विविध जाती धर्माचे व विविध भाषा बोलणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा
By admin | Updated: October 7, 2015 03:02 IST