शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

तर 'वंदे भारत मिशन' ची फुशारकी कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 20:25 IST

'वंदे भारत मिशन' च्या गोंडस नावाखाली केंद्र सरकार सामान्यांकडून मोठी वसुलीच करत असल्याचा आरोप देवानंद पवार यांनी केला असून जनतेने पीएम केअर फंडाला दिलेला पैसा कोणत्या कामासाठी वापरल्या जात आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र सरकारने बाहेर देशात कोरोना संकटामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना 'वंदे भारत मिशन' अंतर्गत मोठा गाजावाजा करून देशात आणले. मात्र यामध्ये तिकिटापासून राहण्या खाण्याचाही खर्च संबंधितांकडूनच तिप्पट-चौप्पट दराने वसूल केल्या जात आहे, तर मग केंद्र सरकार वंदे भारत मिशनची फुशारकी कशासाठी मारत आहे असा सवाल महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार यांनी केला आहे.उल्लेखनीय म्हणजे परदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडूनही ही पठाणी वसुली सुरु आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील बरेच विद्यार्थी किर्गिझस्तान (रशिया) येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. हे विद्यार्थी सामान्य कुटुंबातील आहेत. आर्थिक जुळवाजुळव करून त्यांच्या पालकांनी त्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठविलेले आहे. काही दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या वंदे भारत मिशन अंतर्गत त्यांना भारतात परत आणण्यात आले. विमानाचे तिकीट त्यांना स्वत:च काढले, तेही दुप्पट तिप्पट दराने. काही विद्यार्थ्यांना तर विमान तिकिटासाठी तब्बल त्रेचाळीस हजार रुपयाचे मोजावे लागेल. पुढे नागपूर ते यवतमाळ पर्यंतच्या प्रवासाकरिता प्रतिव्यक्ती ३५०० रुपयांचे भाडे शिवशाही बसने वसूल केले.यवतमाळला आल्यानंतर त्यांना एलआयसी चौकातील हॉटेल पलाश येथे क्वारंटाईन करण्यात आले, मात्र याचाही संपूर्ण खर्च त्या विद्यार्थ्यांनाच करावा लागत आहे. एरवी या हॉटेलचे एका दिवसाचे रूमभाडे हजार ते बाराशे रुपयांपर्यंत असते, आता मात्र या विद्यार्थ्यांना तीन हजार रुपये प्रति दिवस भाडे द्यावे लागत आहे. तसेच चहा, जेवण व पिण्याच्या पाण्यासाठीही तिप्पट पैसे मोजावे लागत आहे. यावरून 'वंदे भारत मिशन' च्या गोंडस नावाखाली केंद्र सरकार सामान्यांकडून मोठी वसुलीच करत असल्याचा आरोप देवानंद पवार यांनी केला असून जनतेने पीएम केअर फंडाला दिलेला पैसा कोणत्या कामासाठी वापरल्या जात आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.परदेशात जाणारा प्रत्येक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतो. त्यातही विद्यार्थ्यांकडून होत असलेली ही लूटमार अतिशय घृणास्पद आहे. बिकट परिस्थितीतही केंद्र सरकारची कमिशनखोरी सुरू आहे. परदेशातून येणाऱ्यांना सक्तीने हॉटेलमध्येच क्वारंटाईन केल्या जात आहे. सरकारने त्यासाठी कोणतीही वेगळी व्यवस्था केलेली नाही. जर सगळं खर्च संबंधितांकडूनच वसूल केल्या जात असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 'वंदे भारत मिशन' चा गवगवा नेमका कोणत्या आधारावर करत आहेत. सध्या कोरोनाची परिस्थिती जगात जवळपास सारखीच आहे. त्यामुळे परदेशातून भारतीय नागरिकांना येथे आणून त्यांना आणखी आर्थिक संकटात लोटणे निषेधार्ह आहे. केंद्र शासनाने निदान विद्यार्थी व सामान्य परिस्थितीतील लोकांसाठी तरी मोफत व्यवस्था करावी, अशी मागणी देवानंद पवार यांनी केली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसVande Mataramवंदे मातरम