लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शेतात कष्ट उपसणारे शेतकरी सर्पदंशाच्या घटनांनी हैराण आहेत. गेल्या नऊ महिन्यात तब्बल ९६ जणांना सर्पदंश झाला. यात शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.शेतकºयांना पिकांना पाणी देण्यासाठी अनेकदा रात्रीच शेतात जावे लागते. रात्रीच्या अंधारात सरपटणाºया प्राण्यांचा उपद्रव अधिक असतो. अंधारात चुकून एखाद्या सापावर पाय पडला की, संबंधित शेतकºयाला किंवा शेतमजुराला सर्पदंशाला सामोरे जावे लागते. विषारी सापाने चावा घेतल्यास प्रसंगी शेतकºयांवर मृत्यूही ओढवतो. अशा अनेक घटना या हंगामात वणी उपविभागात घडल्या आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर जून ते सप्टेंबर या महिन्यात सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडतात. पावसामुळे सापांच्या बिळामध्ये पाणी गेल्याने साप बिळाबाहेर येऊन सुरक्षित जागा शोधतात. शेतशिवार ही त्यांच्यासाठी अतिशय सुरक्षित जागा असते. त्यामुळे सापांची संख्या शेतशिवारात अधिक दिसून येते. वणी विभागात बहुतांश लोकांचा शेती हाच व्यवसाय असल्याने शेतकºयांना दररोज आपल्या शेतात जावेच लागते. शेतात जाताना योग्य खबरदारी घेतली नाही, तर सापांपासून स्वत:चे संरक्षण करणे कठीण जाते.यातूनच यावर्षी सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना आॅगस्ट महिन्यात घडल्याच्या नोंदी ग्रामीण रूग्णालयात आहेत. एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यातील आकडेवारीवरून नजर फिरविली असता, आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक म्हणजे २७ जणांना सर्पदंश झाला. एप्रिलमध्ये सहा, मेमध्ये तीन, जूनमध्ये चार, जुलैमध्ये १७, सप्टेंबरमध्ये १६, आॅक्टोबरमध्ये पाच, नोव्हेंबरमध्ये १२, तर डिसेंबरमध्ये ११ जणांना सर्पदंश झाला.सर्पदंशाच्या वाढत्या घटना लक्षात घेता आरोग्य विभागाने खबरदारी घेतली असून त्यावर आवश्यक असलेली लस मोठ्या प्रमाणावर ग्रामीण रूग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रातही उपलब्ध करून दिली आहे. साधारणत: कृषी पंपाचा वीज पुरवठा हा रात्रीच्यावेळी सुरू केला जातो. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी नाईलाजाने शेतकºयांना जीव धोक्यात घालून रात्रीच्यावेळी शेतात जावे लागते.वणीत ९३३ लोकांना कुत्र्यांचा चावागेल्या काही दिवसांपासून वणी शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे. वर्दळीच्या रस्त्यावर टोळक्याने फिरणाºया या श्वानांनी गेल्या नऊ महिन्यात ९३३ लोकांना चावा घेऊन दहशत निर्माण केली आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
नऊ महिन्यात ९६ शेतकऱ्यांना सर्पदंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST
पावसामुळे सापांच्या बिळामध्ये पाणी गेल्याने साप बिळाबाहेर येऊन सुरक्षित जागा शोधतात. शेतशिवार ही त्यांच्यासाठी अतिशय सुरक्षित जागा असते. त्यामुळे सापांची संख्या शेतशिवारात अधिक दिसून येते. वणी विभागात बहुतांश लोकांचा शेती हाच व्यवसाय असल्याने शेतकºयांना दररोज आपल्या शेतात जावेच लागते. शेतात जाताना योग्य खबरदारी घेतली नाही, तर सापांपासून स्वत:चे संरक्षण करणे कठीण जाते.
नऊ महिन्यात ९६ शेतकऱ्यांना सर्पदंश
ठळक मुद्देवणी उपविभाग : शेतमजूरही असुरक्षित, शासकीय मदतीची योजनाच नाही