शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

कोसारा (सावंगी) घाटातून रेतीची तस्करी

By admin | Updated: December 4, 2014 23:16 IST

तालुक्याला लाखोंचा महसूल मिळवून देणाऱ्या वर्धा नदी पात्रातील कोसारा (सावंगी) रेती घाटातून रात्रंदिवस खुलेआम रेती तस्करी सुरू आहे. मात्र महसूल प्रशासन अद्याप निद्रीस्थ असल्याचे दिसून येते़

मारेगाव : तालुक्याला लाखोंचा महसूल मिळवून देणाऱ्या वर्धा नदी पात्रातील कोसारा (सावंगी) रेती घाटातून रात्रंदिवस खुलेआम रेती तस्करी सुरू आहे. मात्र महसूल प्रशासन अद्याप निद्रीस्थ असल्याचे दिसून येते़यावर्षी तालुक्यातील रेती घाटांचा अद्याप लिलाव झाला नाही़ त्यातच तहसीलदार, नायब तहसीलदारांना तालुक्यातील गौण खनिज, अवैध उत्खनन व रेती तस्करीकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. परिणामी रेती माफिया चांगलेच सक्रिय झाले आहे़ चोरून आणलेली रेती चढ्या भावाने विकायचा, अनेकांचा व्यवसाय झाला आहे़ रेती माफियांनी गावागावात ठिकठिकाणी रेतीचे साठे करून ठेवले आहेत़ तसेच नरसाळा येथील ‘ई’ क्लास जमिनीवर करणवाडी ते वडकी रस्त्यालगत व मिळेल त्या ठिकाणाहून विना रायल्टीने शेकडो ब्रास मुरूमाची चोरी होत आहे.गौण खनिजाची लूट सुरू असल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे़ या गौण खनिज माफियांना तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदारांचा वरदहस्त असावा, असा आरोप केला जात आहे़ कोसारा रेती घाट मारेगाव तालुक्यात येतो. मात्र या घाटावर जाणारा काही रस्ता राळेगाव तालुक्यातून जातो़ त्यामुळे मारेगाव तहसील प्रशासनाचे या घाटाकडे लक्ष नाही. त्यामुळे दररोज रेतीची चोरी होते. ही बाब लक्षात घेऊन राळेगावच्या तहसीलदारांनी या आठवड्यात महसूल मिळवण्यासाठी कोसारा घाटातून रेतीची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर खैरी येथे अडविले. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून मोठा दंड वसूल करून सर्व वाहने वडकी पोलिसांच्या दिली.राळेगाव तहसीलदारांच्या या कारवाईने रेती माफियात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांचे धाबे दणाणले आहे. कारवाई झालेले ट्रॅक्टर चालक धंदेवाईक नसल्याने ते शांत बसतील़ मात्र सराईत व्यावसायीक व रेती माफिया आपल्या अवैध कृत्यापासून परावृत्त होणार नाही़ राळेगाव तहसीलदारांनी केलेल्या कारवाईने येथील महसूल प्रशासनाची चांगलीच नाचक्की झाली आहे.वास्तविक कोसारा गावासाठी स्वतंत्र तलाठी असताना, या रेती घाटावरून रेतीची चोरी होत आहे. हा प्रकार मारेगाव तहसीलदारांना कळू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता तरी येथील महसूल प्रशासनाने सावध होऊन कोसारा घाटातील रेती तस्करी थांबविण्यासाठी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)